काय सांगता..गटातटाच्या राजकारणात सामान्य कार्यकर्ता भरकटतोय..
बारामती:- गटातटाच्या राजकारणात सामान्य व प्रामाणिक कार्यकर्ता भरकटत चालला आहे, आजकाल एकाच पार्टीत राहुन या गटाचा तो,
त्या गटाचा असा सगळा कारभार सुरु
असतो. या गटा- तटात गावगाड्यांचे
राजकारण विभागले असल्याने एकमेकांना
कमी दाखवण्याच्या नादात गटागटात अनेक
भानगडी होत असतात. स्थानिक
निवडणुकीत तर हे गटा-तटाचे राजकारण
सर्वश्रुत असते परंतु या गटा-तटाचा सामना
लोकसभेत व विधानसभेत अनुभवास मिळाला आहे. कधी एकमेकांच्या चेहऱ्यावर चेहरा न टाकणारे आज एका गाडीत बसुन प्रचारासाठी
फिरतांना दिसले होते.एकमेकांचे परस्पर विरोधी असलेले उमेदवार व कार्यकर्ते सगळे विसरुन सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत एक होतील हे म्हणनेही धाडसाचे आहे,सोबत असलाही तरी तो त्या उमेदवाराच्या प्रचाराची नौटंकी मात्र करीत असतो,राजकारण करणारे आज गटा-तटाचे पक्षाचे नेते असले तरी संध्याकाळी मात्र हॉटेलवर यांचे गट बसत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे या गटातटाच राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे,निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्त्यांना बोलवायचं त्यांना स्वप्न दाखवायची आणि वरिष्ठ नेते मंत्री महोदय आले की त्यांच्या पुढे पुढे करून आपली पोळी भाजून घ्यायची ही बाब किती दिवस चालूच राहणार आहे, स्वतःची मर्जी राहावी यासाठी आपल्याच गटाला पद मिळाले पाहिजे ही भूमिका ठेवून प्रामाणिक कार्यकर्ता भरकटला जातोय हे वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी दखल घेतील का?की येरे मागल्या असे म्हनुन पुन्हा त्याच त्याच चमकोगिरी करणाऱ्याना संधी देणाचा नव्हे वशिलेबाजी करून निवडी करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment