युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न !
बारामती:-युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग) व
मुन्नाभाई बागवान(उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) तसेच फुल अँड फायनल ग्रुप बारामती वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. सावित्रीमाई फुले सभागृहात आयोजित शिबिराला बारामती येथील नागरिकांचा व मित्रमंडळींचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि अनेक रक्तदात्यांनी या पुण्याच्या कार्यात सहभागी होत माणुसकीचे दर्शन घडवत *१६१ बाटलीचे संकलन झाले.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी बारामतीच्या मा.नगरसेविका आरती ताई शेंडगे(महिला अध्यक्ष बारामती शहर),पैगंबरभाई शेख(अध्यक्ष सोशल मीडिया पुणे जिल्हा),जयकुमार काळे(सरचिटणीस पुणे जिल्हा) मनोजभाऊ केंगार(अध्यक्ष सामाजिक विभाग बारामती शहर),शहाजी काका जाधव (उपाध्यक्ष बारामती शहर) इकबाल शेख (उपाध्यक्ष बारामती शहर अल्पसंख्याक विभाग) यांनी रक्तदानाचे महत्व मोजक्या शब्दात मांडले.
सर्व रक्तदात्यांचे योग्य प्रकारे नोंदणी, तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या शिबीरामुळे अनेक गरजू रुग्णांना संजीवनी मिळेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. भविष्यात असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान"
*अस्लम रज्जाक तांबोळी-
अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग
No comments:
Post a Comment