बारामती नगर परिषद समोर पथविक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 12, 2025

बारामती नगर परिषद समोर पथविक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा..

बारामती नगर परिषद समोर पथविक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा..
बारामती :- बारामती नगर परिषद समोर  दिनांक १५/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता भीक मांगो आंदोलन पथविक्रेते व भारतीय युवा  पँथर संघटना करणार असल्याची माहिती बारामती नगर परिषद पथविक्रेता समिती सदस्य गौरव अहिवळे यांनी दिली.
 बारामती शहरात अनेक वर्षापासून पथविक्रेते व्यवसाय करीत आहेत.सदर पथविक्रेते यांच्यावर बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कारवाईचा सपाटा चालू केल्यामुळे पथविक्रेते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती एम.आय.डी.सी.रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणारे पथविक्रेत्यांना सुशोभिकरण केल्यामुळे व्यवसाय करण्यास एक प्रकारे बंदीच घातली आहे.सुशोभिकरण केले पाहिजे पण जनतेच्या पोटावर पाय देऊन  करणे योग्य नाही.
पथविक्रेत्यांवरती अतिक्रमणची सुरू असलेल्या कारवाईचे कारण अद्याप समजलेले नाही फक्त एवढीच चर्चा आहे की वरून आदेश आला आहे. त्यामुळे नेमका आदेश नेत्याचा आहे का? 
व्यवसाय करून पोट भरणारे नागरिकांवर सुशोभिकरण मुळे उपासमारीची वेळ येत असेल तर असा विकास आम्हाला नको म्हणण्याची वेळ  पथविक्रेत्यांवर आली आहे.
उपमुख्यमंत्री यांनी रस्त्याच्या बाजूला सुशोभीकरणात दुकाने उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामधून मिळणाऱ्या करातून सुशोभीकरणाची देखभाल करणार आहेत. त्याच ठिकाणी व्यवसाय करणारे पथविक्रेते हे देखील नगरपालिकेला कर देत होते आणि आज देखील देण्यास तयार आहेत.तरी देखील पथविक्रेत्यांचा विचार या ठिकाणी केलेला नाही. सदर बांधलेले दुकाने विकत घेण्यासाठी पथविक्रेत्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पथविक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.
शहरामध्ये अनेक बांधकामे अनधिकृत असताना फक्त पथविक्रेत्यांवरती कारवाई केली जात आहे. 
 पथविक्रेते यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असे गौरव अहिवळे बारामती नगर परिषद पथविक्रेता समिती सदस्य , संस्थापक अध्यक्ष भारतीय युवा पॅंथर संघटना यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment