खळबळजनक..मोजणी कार्यालयातील गैरप्रकार उघडकीस,दुसरा गुन्हा दाखल..
पुणे:-भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचे एका वृत्त्तपत्राने चांगलेच लावून धरले असल्याचे दिसत आहे, यामुळे भूमिअभिलेख कार्यालयात एव्हड्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्यामध्ये कोणकोण सामील होतंय हे पुढे येत आहे, अश्या वेळी असे कित्येक अधिकारी व कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांच्या नावे किती प्रॉपर्टी आहे हे तपासणे देखील महत्वाचे असल्याचे नागरिक बोलत आहे,नुकताच हवेली मोजणी कार्यालयातील 'हेलीकॉप्टर शॉट टीम' मधील भूकरमापक विरेंद्र कोकरे यांच्यावरही येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जागेवर न जाता ऑफिसमध्ये बसून 'क' प्रत तयार करणे, तसेच चुकीच्या मोजणीवरुन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आणखी एक दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोजणी कार्यालयातील गैरप्रकारांचा कारभार बाहेर निघाला आहे.सरकारी मोजणीच्या तारखे अगोदरच क प्रत दिली असल्याचे सांगितले,प्रसिद्ध झालेल्या बातमीची
दखल घेत, चौकशीअंती उपअधिक्षक अमरसिंह पाटील व भूकरमापक विरेंद्र कोकरे यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.मौजे पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील मोजणी प्रकरणात
गुन्हा दाखल झाला आहे. येथील गट नबंर 427 च्या अतितातडी हद्द कायम मोजणीमध्ये, मोजणी रजिस्टर नबंर 12025 बाबत हा प्रकार संबंधित टीमने केला आहे. ही मोजणी तरटे नावाच्या भूकरमापकाकडे होती. तसेच त्या मोजणीची तारीख 6 जून 2024 अशी होती. या मोजणी प्रकरणात सहधारक व लगतधारक शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा बजावलेल्या नाहीत. मात्र, असे असताना विरेंद्र कोकरे या भूकरमापकाने 6 जून ऐवजी 3 एप्रिल 2024 ला मोजणी केली. तसेच तात्काळ 5 एप्रिलला 'क' प्रत दिल्याचे कार्यालयीन रजिस्टरला नमूद आहे. संबंधित मोजणी ही कोकरे भूकरमापकाकडे नसतानाही त्याने हा पराक्रम केला आहे.भूकरमापक किरण येटाळे व विरेंद्र कोकरे सेटींगमधील मोजण्यांचे निलंबित उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांचे राईट लेफ्ट सर्व्हेअर यांची खास ओळख आहे.त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व सेटींगमधील मोजण्या रडारवर आल्या आहेत. मोजणी तारखेच्या अगोदरच मोजणी करुन फक्त दोन ते तीन दिवसांत 'क' प्रत देण्यात त्यांचा
हातखंडा आहे असं देखील कळतंय. सर्वांत जलद मोजणी करुन 'क' प्रत देण्यात संबंधित सर्व्हेअरची मास्टरमाईंड म्हणून ख्याती
आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे कार्यालयातील इतरही भूकरमापक चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.हवेली मोजणी कार्यालयाचा ऑनलाईन व ऑफलाईनचा वेगळाच खेळ सुरू आहे. संबंधित मोजणीला हरकत नोंदवली होती. मात्र, कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विजय साबळे यांनी या हरकत अर्ज लपवून ठेवला.
मोजणीच्या तारखे अगोदरच अर्जदाराला 'क' प्रत दिली गेली. गुन्हा दाखल झाल्याने चौकशीत व तपासामध्ये आणखी इतर बाबी समोर येतील. तसेच कोणी संगनमताने कट कारस्थान केले आहे, हे ही समोर येईल. त्यानुसार यातील आरोपींच्या संख्येत निश्चित वाढ होईल, अशी
अपेक्षा आहे असे स्वप्नील भोरडे, तक्रारदार यांनी सांगितले,शेतकरी पालखी महामार्ग संपादन मोजणीत चुकीचं काम करणाऱ्या भूकरमापकावर गुन्हा दाखल होणार का अशी मागणी होत असून मौजे फुरसुंगी येथील रस्ता रुंदीकरण संपादन मोजणीत लाभार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे.चुकीच्या वहिवाट मोजणीमुळे बोगस लाभार्थ्यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयांवर हात साफ केला आहे.खऱ्या लाभार्थ्यांना अजूनही संपादित जागेचा मोबदला मिळाला नाही. मोजणीमध्ये चुकीची वहिवाट दाखवल्याने
हा प्रकार समोर आला आहे. आमच्या कुटुंबाची जागा रस्ता रुंदीकरणात संपादित झाली आहे. त्याचा मोबदला तात्काळ मिळावा. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हर्षवर्धनराव हरपळे यांनी केली आहे.अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे.
*पालखी मार्ग, रेल्वे मार्ग, रस्ता रुंदीकरण अश्या कामात शेतकऱ्यांची मोजणी करताना लाखो रुपये टक्के वारी स्वरूपात स्वीकारली असल्याचे कळतंय, याची चोकशी होईल का अशी मागणी होत असताना, मोजणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी होईल का?त्यांच्या मालमत्तेची त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेची चौकशी होणार का?असा सवाल जनतेला पडला आहे.यासाठी निवेदन देऊन तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचे कळतंय.*
No comments:
Post a Comment