तहसिल कार्यालयात ६० हजारांची लाच घेताना दोनजण अटक तर अपर तहसीलदार फरार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 16, 2025

तहसिल कार्यालयात ६० हजारांची लाच घेताना दोनजण अटक तर अपर तहसीलदार फरार..

तहसिल कार्यालयात ६० हजारांची लाच घेताना
दोनजण अटक तर अपर तहसीलदार फरार..
छत्रपती संभाजीनगर :-लाच प्रकरणात अनेक घटना पुढे आल्या असून नुकताच  तहसील कार्यालयात जमिनीच्या क्षेत्रदुरुस्तीसाठी अपर
तहसीलदारांसाठी ३ लाखांची लाच मागून त्यातील ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी, १५ मे रोजी रंगेहाथ पकडले.तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार आहे.तक्रारदाराने आपल्या मुलाचे आणि नातेवाईकांचे प्लॉट
मिटमिटा येथे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रदुरुस्ती संदर्भात डिसेंबर २०२४ पासून पाच फाईल्स तहसील कार्यालयात प्रलंबित होत्या. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान, काम त्यांच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे १३ मे रोजी तक्रार
दाखल केली. पडताळणीमध्ये तक्रारदाराला आरोपी अपर तहसीलदार नितीन गर्जेचा खासगी सहाय्यक नितीन चव्हाण याने पाच फाईल्ससाठी एकूण ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दर फाईल ६० हजार इतकी रक्कम मागितली गेली होती.या लाचेची रक्कम तक्रारदाराने स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर, एसीबी पथकाने १५ मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी नितीन चव्हाण
याने लाच घेतली नाही, मात्र ती रक्कम तहसील कार्यालय परिसरात पार्कींगचे काम पाहणाऱ्या सोहेल जुबेर बहाशवान याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही रक्कम सोहेलकडे दिली. यावेळी इशारा मिळताच सोहेलला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर  सोहेलला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर
पथकाने चव्हाण यास देखील ताब्यात घेतले. तर अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पो. उप अधिक्षक सुरेश नाईकनवरे, पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या नेतृत्वात पोह राजेंद्र जोशी, पोअं अनवेज शेख यांच्या पथकाने केली.पार्किंगवाल्याकडे देण्यास सांगितली रक्कम या लाचेची रक्कम तक्रारदाराने स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर, एसीबी पथकाने १५ मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी नितीन चव्हाण याने लाच घेतली नाही, मात्र ती रक्कम तहसील कार्यालय परिसरात पार्कींगचे काम पाहणाऱ्या सोहेल जुबेर
बहाशवान याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही रक्कम सोहेलकडे दिली. यावेळी इशारा मिळताच सोहेलला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने चव्हाण यास देखील ताब्यात घेतले. तर अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार झाला आहे, तपासणीत पथकाने आरोपी नितीन चव्हाणकडे एक
आयफोन, एक मोबाईल आणि ७५ हजार रोख रक्कम सापडली. तर आरोपी सोहेल बहाशवानकडे एक सॅमसंग एस २२ मोबाईल आणि लाचेचे ६० हजार रुपये सापडले.
या प्रकरणात अपर तहसीलदार नितीन गर्जे याने लाच मागणीसाठी खासगी इसमाला सांगितल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नितीन चव्हाण व सोहेल बहाशवान यांच्यावर कलम ७ए अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत असून, पोलीस स्टेशन सिटी चौक,छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

No comments:

Post a Comment