पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल यांची बारामतीला भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 18, 2025

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल यांची बारामतीला भेट..

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल यांची बारामतीला भेट..
बारामती :- नव्याने रुजू झालेले पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी बारामतीत पोलीस स्टेशन ला भेट दिली यावेळी पत्रकार बांधवाशी सवांद साधण्यात आला, यावेळी पत्रकारांशी बोलताना व विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलताना म्हणाले की, नागरिकांना दिलासा देत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाधिक लोकाभिमुख कामावर आपला भर असेल, अशी ग्वाही पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली. बारामती शहर पोलिस ठाण्याला भेटी देत त्यांनी पोलिस कर्मचारी व अधिका-यांशी थेट संवाद साधला.पोलिसांच्या अडचणींचा आढावा घेत मुलभूत सुविधा
उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द असू अशी ग्वाहीही  त्यांनी दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक विलास नाळे, चंद्रशेखर यादव, वैशाली पाटील सह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी
आदी उपस्थित होते.गिल म्हणाले, बारामतीत सुरु असलेले शक्ती अभियान लवकरच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राबवू. याला प्रतिसाद चांगला असून त्या मुळे महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. वाहतूकीचा प्रश्न सगळीकडेच जटील बनला
आहे. जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनास सोबत घेऊन या वर उपाययोजना कशा करता येतील, याचा प्रयत्न करु.मालमत्ताविषयक गुन्हे उघडकीस येण्याची टक्केवारी अत्यल्प असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या बाबत
स्वतंत्र पथकांमार्फत तपासाला गती देऊ, असे त्यांनी नमूद केले.सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक होऊ नये या साठी जिल्हा पोलिसांकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
जारी केल्या जातील, या बाबत लोकांचे समुपदेशन केले जाईल, असेही ते म्हणाले.यावेळी पत्रकार बांधवांनी त्यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment