अल्पवयीन मेहुणी वर अत्याचार करणा-या आरोपीस आजन्म कारावास व ३०,०००/- रुपये दंडाची शिक्षा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 19, 2025

अल्पवयीन मेहुणी वर अत्याचार करणा-या आरोपीस आजन्म कारावास व ३०,०००/- रुपये दंडाची शिक्षा..

अल्पवयीन मेहुणी वर अत्याचार करणा-या आरोपीस आजन्म कारावास व ३०,०००/- रुपये दंडाची शिक्षा.. 
बारामती:- बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश - श्रीमती एस.एस. सस्ते सो यांनी दिनांक १९/०५/२०२५ रोजी पोस्को का क ४.६,८,१२ अन्वये आरोपीस मरेपर्यंत आजन्म कारावास व  ३०,००० / रुपये दंड दंड न भरल्यास २ वर्षे साधा कारावास तसेच दंडाच्या रक्कमेतील रुपये १५,०००/–पिडीतेस नुकसान भरपाई म्हणुन देण्यात यावी अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच जिल्हा विधी समिती पुणे यांना कायदयान्वेय पिडीत मुलीस ज्यादा नुकसान भरपाई रक्कम देण्याचा आदेश केला आहे.या प्रकरणाची हकीकत आरोपी वय ३२ वर्षे याच्या पत्नीची लहान बहिण (पिडीत) वय १२ वर्षे ही बालगृह संस्थेमध्ये लहानपणा पासुन शिक्षण घेत होती. तिचे आई वडील तिचे लहानपणीच मयत झाले होते. आरोपीने तिला शिक्षणासाठी त्याच्या गावी घेवुन आला होता.दि.५/५/२०१९ रोजी रात्री पत्नी घरी नसताना पिडीता हि घरात ऐकटी झोपलेली असताना. आरोपीने तिस धमकी देवुन तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. व घडलेला प्रकार कोणाला सांगु नको नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. पिडीत मुलीने दुस-या दिवशी आरोपीची आई व त्यानंतर तिच्या आजीस सांगितला होता.त्यानंतर घडलेला प्रकार पिडीतीच्या बहीणीस समजला होता त्यावरुन
तिचे व आरोपी मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी तिने विषारी औषध पिले होते त्यामुळे ती मयत झाली. त्याबाबत पिडीतीने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपीने तिच्यावर केलेल्या बलात्काराबाबत सविस्तर तक्रार दिली होती.त्यानुसार आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्या अनुषंगाने पो.स. ई.बी.बी. जाधव यांनी गुन्हयाचा सखोल तपास करुन
सदरच्या आरोपी विरुध्द पो स्को का क ४,६,८,१२ व भ.द.वि.क. ३७६ प्रमाणे मे.
कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदिप ओहोळ यांनी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासले. सदर पिडीतेने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. पिडीतीचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राहय धरुन आरोपीस मा.तदर्थ जिल्हा न्यायाधीश- २ एस. एस. सस्ते सो यांनी आरोपीस वरील प्रमाणे दोषी धरून शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये आरोपीच्या तर्फे पिडीत मुलीच्या आत्याची साक्ष घेण्यात आली होती. त्यामध्ये तिने आरोपीचे बाजुने साक्ष दिली होती परंतु में कोर्टाने तिची साक्ष ग्राहय धरली नाही.विशेष सरकारी वकील संदिप ओहोळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये
सरकारी वकील संदिप ओहोळ यांना कोर्ट अंमलदार सहा. फौजदार ए. जे. कवडे तसेच म.पो.हवा. एम.के. शिवरकर ब नं २०३८ तसेच कोर्ट पैरवी अधिकारी ग्रे पो.स. ई. नामदेव नलवडे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment