आरटीओचा लोगो लावून वाहनचालकांकडून पैसे उखळणारे दोन तोतया आरटीओ अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 9, 2025

आरटीओचा लोगो लावून वाहनचालकांकडून पैसे उखळणारे दोन तोतया आरटीओ अटक...

आरटीओचा लोगो लावून वाहनचालकांकडून  पैसे उखळणारे दोन तोतया आरटीओ अटक...
पाथर्डी:-अनेक आरटीओ कार्यालयात एजंट नेमले असून त्यांच्या मार्फत ओव्हर लोड वाहनासह इतर वाहन चालकाकडून कार्ड स्वरूपात पैसे वसूल करीत असल्याचे ऐकले होते, नव्हे तशी अनेक तक्रारी देखील दाखल केल्याचे समजतंय परंतु आत्तातर तोतया आरटीओ सुद्धा असल्याचे पुढे आले आहे, याबाबत मिळालेली माहिती अशी की,आरटीओ कार्यालयाचा लोगो लावलेल्या जीपमध्ये खाकी गणवेश घालून वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोटार वाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी फिर्याद दिली असून, या घटनेतील दोघाही तोतया अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यातील एलसीबीच्या पथकाने अटक केली.या संदर्भात अधिक माहिती अशी की, नगर येथील केवल जग्गी यांच्या मालकीचा ट्रक घेऊन चालक अशोक पांचाळ हा बीडकडे जात असताना पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे त्याच्या मागून आरटीओचा लोगो लावलेली जीप आली. त्यातील तोतया अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाला 'तुझ्या गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र संपले आहे. तुला ६४ हजार दंड भरावा लागेल,' असे सांगितले असता चालकाने जग्गी यांना फोन लावला. जग्गी हे त्या तोतयांशी बोलले असता, त्यांनी २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याने जग्गी यांना संशय आला व त्यांनी मोटारमालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क केला.सानप त्या तोतयांशी बोलले असता, त्यातील एकाने आपण वडाळा आरटीओ कार्यालयामधून सूर्यवंशी बोलतोय, असे सांगितले. सानप यांना संशय आल्याने त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांना या प्रकरणाची माहिती दिली. सगरे यांनी पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले. पाटील यांनी जीप कोणत्या ठिकाणची आहे, याची चौकशी केली असता, ती ठाणे आरटीओ कार्यालयाची असल्याचे समोर आले. मात्र, जीप त्यांच्या कार्यालयात असल्याचीही माहिती मिळाली व तेथे सूर्यवंशी नावाचे कोणीही अधिकारी नाहीत, असे समजले.त्यानंतर पाटील यांनी अज्ञात दोन आरोपी विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, हे दोघेही तोतया अधिकारी बीड जिल्ह्यात गेले असल्याचे समजताच अहिल्यानगर आरटीओ कार्यालयाने बीड आरटीओ कार्यालयाशी संपर्क केला असता, बीड आरटीओ कार्यालयातील अधिकारी गणेश विघ्ने यांनी या दोघांना वाहनासह ताब्यात घेत बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.आरोपी यांनी आपली खरी ओळख लपली होती.ट्रकमालकाला वडाळा आरटीओ कार्यालयातील सूर्यवंशी बोलतो, असे सांगितले होते. मात्र, आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी खोटी नावे धारण केल्याचे समोर आले.
आरोपींची खरी नावे अजय गाडगे व दिनेश धनवर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.याबाबत अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment