माळेगाव कारखान्याचा सर्वांगिण विकास हा चंद्रराव तावरे यांच्या दूरदृष्टीमुळेच.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

माळेगाव कारखान्याचा सर्वांगिण विकास हा चंद्रराव तावरे यांच्या दूरदृष्टीमुळेच..

माळेगाव कारखान्याचा सर्वांगिण विकास
 हा चंद्रराव तावरे यांच्या दूरदृष्टीमुळेच..
बारामती:-माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. मळद,
निरावागज, मेखळी येथे सोमवार (ता. १६) रोजी अजित पवार यांनी विरोधक चंद्रराव तावरे यांना टीकेचे चांगलेच लक्ष केले होते. तोच धागा पकडत रंजन तावरे यांनी आज कुरणेवाडी, बारवनगर येथे पवारांच्या आरोपांचे खंडण
केले.तावरे म्हणाले, "माळेगाव कारखान्याचा सर्वांगिण विकास हा चंद्रराव अण्णांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. साखर कारखान्याचे विस्तारिकण, डिस्टलरी प्रकल्प, विजनिर्मिती
प्रकल्प, शिवतीर्थ मंगल कार्यालय, शिक्षण संस्था
उभारण्यासाठी चंद्रराव अण्णांनी मोठे योगदान दिले आहे.५० वर्षात पवार कुटुंबियांना बारामतीकरांनी लोकसभा,विधानसभा यासह सर्वकाही दिले. तरीही त्यांना शेतकऱ्यांचा माळेगाव कारखाना पाहिजे. हे सभासद
कदापीही खपून घेणार नाहीत. त्याचा प्रत्यय या
निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांच्या बोलण्यातून येत आहे. मागील निवडणूकीमध्येच आम्ही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हारलो होतो, आता त्याची पुर्णतः खबरदारी घेतली आहे. `माळेगावची निवडणूक ही पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे.परंतु ही निवडणूक शेतकरी, सभासदांच्या प्रपंचाची आहे.मुला बाळांच्या भवितव्याची आहे. त्यासाठी सभासद बंधूनो
आपल्याला या महासत्तेशी लढताना एकजूटीने प्रयत्न कऱणे गरजे आहे. अन्यथा माळेगाव कारखाना जर पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या हातात गेला, तर शेजारची पुन्हा ११ गावे जोडण्याचा घाट ही मंडळी घालतील.त्यामुळेच आम्ही सभासदांना सत्तापरिवर्तन करण्यासाठी सहकार बचाव पॅनेलच्या किटली या चिन्हावर मतदान
करण्याची विनंती करीत आहे, ` असे तावरे यांनी सांगितले."शेतकरी विकासाचा एकच आधार, आपल्या माणसांचा आपला सहकार,'' अशी घोषणा देत रंजन तावरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपलेसे केले.यावेळी माळेगावचे विरोधी संचालक ॲड. जी.बी. गावडे यांनी
बोलताना सांगितले की,माळेगावच्या निवडणूकीत चंद्रराव अण्णांचा फॅक्टर चालणार आहे. अण्णा हे सहकारी साखर उद्योगात जाणकार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच माळेगावच्या सभासदांचा अण्णांवर विश्वास आहे.आजवरच्या प्रचारात प्रक्रियेत सहकार बचाव शेतकरी
पॅनेल निवडून येणार, हे चित्र सर्वांना दिसू लागले आहे.पवारांची कृती ही व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे.असे मत माळेगावचे विरोधी संचालक ॲड. जी.बी. गावडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment