अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वयोवृध्द आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा..
न्यायाधीश श्रीमती एस. एस. सस्ते यांनी आरोपी कुंडलिक बाबुराव जाधव वय–७५ वर्षे रा. नारोळी ता. बारामती, जि. पुणे यांस अल्पवयीन पिडीत मुलगी वय वर्षे १३ हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ (२) तसेच भा. दं. वि. कलम ३७६ (३) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी
भोगण्याची व रुपये २५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील रकमेपैकी २० हजार रुपये पिडीत मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा व तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना पिडीतेस कायदयान्वये जादा नुकसान भरपाई रक्कम देण्याचाही आदेश करण्यात आला.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १९/०५/२०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी ही आरोपीच्या घरासमोरुन जात असताना, आरोपी कुंडलिक बाबुराव जाधव याने पिडीत मुलीस हाक मारुन त्याच्या घराजवळ बोलावले व
राजवळील संडास मध्ये तिला जाण्यास भाग पाडुन त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर भितीमुळे पिडीत मुलीने सदरची घटना घरी सांगितली नव्हती. त्यानंतर तिच्या पोटात दुखु लागल्याने तिने दि. २४/०५/२०२० रोजी सदरची घटना तिची चुलती,आई, वडील यांना सांगितली. सदरच्या घटनेबद्दल पिडीत मुलीची चुलतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुध्द फिर्याद दिली होती. सदरील गुन्हयाचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके यांनी करुन आरोपीविरुध्द मे.
कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरील केसमध्ये फिर्यादी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी सदर केसमध्ये एकुण ४ साक्षीदार तपासले. पिडीत मुलीने आरोपीने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचार केलेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. सदरील प्रकरणात पिडीत मुलीची साक्ष ही विश्वसनीय असुन त्यास तिची चुलतीची साक्ष व तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष पुष्टी देत
असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी केला होता. तो ग्राहय धरुन मे. कोर्टाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सदर प्रकरणी पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे, जी. के.कस्पटे तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार भागवत पाटील यांनी सरकारी वकीलांना केस कामी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment