बारामतीत आरटीओ कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात आरपीआय चे तीव्र आंदोलन..
बारामती:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात दि. 20 जून 2025 रोजी बारामती आरटीओ अधिकारी करत असलेल्या भ्रष्टाचार विरोधी हलगी नाद आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी धक्कादायक आरोप करण्यात आले,व घोषणा बाजी करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते आंदोलन करतेवेळी महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या व भ्रष्ट बारामती आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकारी यांच्या विरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने IMV साळोखे यांची तात्काळ बदली करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, तसेच चालक महादेव तनपुरे याला आरटीओ कार्यातून हद्दपार करून त्याच्याही मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व ओव्हरलोड चालणाऱ्या ट्रक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व आरटीओ घेत असलेले हप्ते तात्काळ कायम स्वरुपी बंद करावेत, व 3020 ओव्हरलोड चालणाऱ्या गाड्या यांच्याकडून प्रत्येकी 2500 ते 3000 रुपये एवढी मोठी वसुली तात्काळ कायमस्वरूपी बंद करावी, व ओव्हरलोड ट्रक यांना कार्ड वाटून हप्ते वसुली नऊ एजंट च्या माध्यमातून केली जाते त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व हे हप्ते जमा करून महादेव तनपुरे यांच्या माध्यमातून IMV साळोखे यांच्याकडून सर्व अधिकाऱ्यांना वाटप केले जाते ते तात्काळ थांबवा व हप्ते वसूल करणारे नऊ एजंट व आरटीओ अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व पासिंग रजिस्ट्रेशन यामध्ये जे पैसे नाहक उकळले जातात ते त्वरित थांबवा अशी मागणी करण्यात आली त्या समयी आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यासमयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे मा बाळासाहेब गायकवाड (पुणे जिल्हा उपाध्यक्ष) मा संतोष लोंढे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष) मा सिद्धार्थ गायकवाड (वेल्हे तालुकाध्यक्ष) मां शिवराज पवार (इंदापूर तालुकाध्यक्ष) मा सुहास कदम (शिरूर तालुकाध्यक्ष) मा शशांक गायकवाड (दौंड शहराध्यक्ष) मा सुहास गायकवाड (पुणे शहराध्यक्ष) मा वैभव शिंदे (हवेली तालुकाध्यक्ष) मा संजय आयरेल्लू (वाहतूक अध्यक्ष दौंड) मा दिगंबर रिकिबे (कार्याध्यक्ष दौंड) मा आनंद ओव्हाळ (विद्यार्थी दौंड तालुकाध्यक्ष) मा अभय भोसले (दौंड शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी) मा समीर सय्यद (RPIकार्यकर्ते) मयूर उदावंत (कामगार अध्यक्ष) मा सनी गायकवाड (RPIकार्यकर्ते) मा अजय भोसले (RPIकार्यकर्ते) मा नागेश गोकुळ (RPIकार्यकर्ते) मा तुषार वनशिव (उपाध्यक्ष दौंड) मा अब्दुल सौदागर (संघटक दौंड) मा अनिकेत सवाने (संघटक दौंड तालुका) मा सुनील कांबळे (आरपीआय नेते) मा अजित भालेराव (आरपीआय दौंड) शिवाजीराव मुद्दन (सामाजिक कार्यकर्ते) ईश्वर सांगळे (सामाजिक कार्यकर्ते) व आर पी आय (A) चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,बारामती आरटीओ कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व हलगी नाद आंदोलन सचिन भाऊ खरात पुणे जिल्हाध्यक्ष RPI (A) यांच्याकडून करण्यात आले.यावेळी आरटीओ अधिकारी सुरेंद्र निकम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली, आरटीओ अधिकारी निकम यांनी यावेळी आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिले.यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
No comments:
Post a Comment