"चाय पेक्षा किटली गरम"..माळेगाव कारखाना मतदान प्रकिये दरम्यान चर्चा तर होणारच...
बारामती:-नुकताच बारामती तालुक्यातील गाजलेली माळेगाव सह साखर कारखाना निवडणूक या निवडणुकीत खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध जेष्ठ नेते चंद्रआण्णा तावरे यांच्या पॅनल ची आरोप प्रत्यारोप करीत प्रचाराची सांगता झाली, मतदान प्रकिया सुरू झाली यावेळी आप आपल्या पॅनेलचे कार्यकर्ते मतदान आपल्या पॅनेलला कसे होईल ह्यासाठी धडपड करीत होता,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निलकंटेश्वर पॅनल चे चिन्ह कपबशी होते तर सहकार बचाव पॅनलचे किटली हे चिन्ह होते परंतु यावेळी एक गोष्ट निकर्षाने जाणवली ती म्हणजे मतदान केंद्राशेजारी लावलेल्या मंडप(मतदान बूथ) मध्ये नेते, कार्यकर्ते व येणारा मतदार यांची संख्या जास्त होत होती त्यामुळे आवर्जून चहा पिण्याचा कार्यक्रम मात्र सतत होत होता, यामुळेच कदाचित "चाय पेक्षा किटली गरम" असे म्हंटले तर वाववे होणार नाही, कारण जवळच चहाचे दुकान होते त्या चहावाल्याची चहा बनविण्याची किटली मात्र सतत गॅसवर गरम होताना दिसत होती हे मात्र खरंय.
No comments:
Post a Comment