बारामती येथिल मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.पाटील यांनी दरोडा व खून केल्याच्या आरोपातून सात जणांची निर्दोष केली मुक्तता..
बारामती:-दि. १४/३/२०१६ रोजी रात्री०२.०० वाजण्याचे सुमारास गोपाळवाडी रोड, सरपंचवस्ती दौड ता दौड जि.पुणे येथे फिर्यादी श्रीमती रेखा अनिल बारवकर यांच्या राहते घरी त्या व त्यांचे पती अनिल भिमराव बारवकर असे बेडरुममध्ये झोपलेले असताना त्यांना चोरट्यांनी जबरी मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दोन रिंगा,अंगठ्या, चार सोन्याच्या बांगड्या, तसेच सोन्याचे लहान गंठण असे रु.१,२००००/- रुपयांचे सोन्याचे दागीने जबरीने चोरुन नेहले होते. सदर मारहाणीत फिर्यादी चे पती गंभीर जखमी झाले होते त्यांना रुबी हॉल क्लीनीक पुणे येथे ऍडमिट केले होते तेथे औषधोपचार चालू असताना ते मयत झाले होते
सदर घटनेबाबत आरोपी नामे अविनाश भोसले,किरण भोसले,सुनील शिंदे,किशोर काळे जितेंद्र भोसले,विठ्ठल भोसले,सखत भोसले यांचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे भा.द.वी.कलम 396,397 नुसार गुन्हा दाखल झाला होता
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक हंकारे यांनी केला. तपासा दरम्यान फिर्यादी,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,ओळखपरेड,आरोपींचे कबुली जबाब आणि हत्यार जप्ती पंचनाम्यांसह इतर साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात सादर केले होते
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले.
सदर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,इतर साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्यावरून गुन्हा आरोपींविरुद्ध सिद्ध होत असल्याने त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे केली.
तसेच फिर्याद देण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे घटनेबाबत सांगितलेली माहिती, पंचनाम्यातील खाडाखोड, साक्षीदारांची जबाबातील विसंगती,ओळखपरेड घेणेस झालेला उशीर,मा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाडया प्रमाणे ओळख परेड घेणेत झालेल्या त्रुटी, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्तीबाबत चा संशय या सर्व बाबींचा आरोपीना लाभ देण्यात यावा,असा बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला.
मे.कोर्टाने सर्व साक्षीदारांचे जाबजबाब व परिस्थितीजन्य पुरावा,तपासातील त्रुटी याचा विचार करून आरोपी विरुद्ध गुन्हा नि:संशयपणे शाबित होत नसल्याने सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड.विजयसिंह मोरे,ॲड.बी.एम.झगडे,ॲड.प्रसाद खारतुडे ॲड.अतुल पाटील,ॲड.पंकज काटे, ॲड.धनश्री जाधव यांनी काम पाहिले तसेच ॲड. विजयसिंह मोरे असोसिएटस् यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment