शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी १०,००० रूपये दंड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 30, 2025

शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी १०,००० रूपये दंड.

शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी १०,००० रूपये दंड.
बारामती:-दिनांक ३०/०६/ २०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. ३
मा. हितेंद्र उर्मीला अनिलकुमार वाणी साो, यांनी आरोपी नाव भाउसो,जयराम शिंदे
रा. गिरीम ता. दौंड जि. पुणे यास शासकीय कामात अडथळा आणल्याबददल २ वर्षे
सश्रम कारावासाची व ५००० /- रुपय दंड व लोकसेवकास जिव मारणेची धमकी
दिल्याबददल २ वर्षे सश्रम कारावासाची व ५००० /- रुपये दंड असे एकुण चार वर्षे
सश्रम कारावास व १०,००० /- रुपय दंड व सदर शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मा.
न्यायालयाने दिला आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २२/०५/२०१९ रोजी आरोपी यांनी
फिर्यादी श्रीमती शितल गंगाराम मिरगल वनरक्षक कुरकुंभ या वनक्षेत्रात गस्त करत
असताना आरोपी हे वनक्षेत्रात जेसीबी साहयाने उत्खनन करत असताना असता
हातकरून थांबले असता आरोपी यांनी फिर्यादीस ढकलून देउन गळयाला हात लावून
जिवंत मारू टाकू असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याबददल दौंड पोलीस
स्टेशनला गु.र.नं ३०९/२०१९ अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील
गुन्हयाचा तपास तात्कालीन पोलीस हवालदार के. के. शिंगाडे यांनी केला तपास करुन
कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
केसमध्ये अति.
शासकीय कामात
सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी पंच व वनविभागाचे अधिकारी
तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आली. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे
अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले.
सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरुन
अडथळा आणल्याबददल भा द वी कलम ३५३ यांस २ वर्षे सश्रम कारावासाची व
५००० /- रुपये दंड व लोकसेवकास जिव मारणेची धमकी दिल्याबददल भा द वी
कलम ५०६ २वर्षे सश्रम कारावासाची व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणी एन. ए. नलवडे सहा. पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस
उपनिरीक्षक कसपटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच त्यास
पोलीस हवालदार मनिषा अहिवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment