बारामती:- बारामतीत नुकताच खळबळ जनक घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरिष्ठांचा अतिरिक्त दबाव सहन न झाल्याने सुसाईड नोट लिहून येथील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची घटना काल रात्री
घडली. शिवशंकर मित्रा असे आत्महत्या
केलेल्या मुख्य व्यवस्थापकांची नाव
आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे घटना
घडल्याने बारामतीत खळबळ उडाली
आहे.शिवशंकर मित्र (वय 52 वर्ष रा.
प्रयागराज) असे या बँक प्रबंधकाचे नाव
असून त्यांनी पाच दिवसापूर्वीच बँकेकडे
अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने
स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काल रात्री त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्ये पूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. यामध्ये त्यांनी नमूद केले की, मी शिवशंकर मित्रा,
मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की,कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू
नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची
पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर
टक्के आपले योगदान देत असतात.
मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत
असताना व स्वतःच्या इच्छेने करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही
चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू
नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे
आत्महत्या करत आहे. पत्नी प्रिया यांना
उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर.
माही मला माफ कर ! असे त्यांनी पत्नी
प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं
आहे. त्यांनी शक्य झाल्यास माझे डोळे
दान करावेत अशी देखील इच्छा व्यक्त
केली. बँकिंग क्षेत्रातील विशेषता खाजगी
बँकांच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील वार्ता
दबावाचे दबावाचा शिवशंकर मित्र हे
बळी ठरले आहेत. मित्रा यांच्या पत्नी
माही यांना या घटनेने मोठा धक्का
बसला असून बारामतीत उलट सुलट चर्चा सुरू असून याचा सखोल तपास होईल का?
No comments:
Post a Comment