गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३,३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमालासह ट्रक जप्त करून आरोपी जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 18, 2025

गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३,३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमालासह ट्रक जप्त करून आरोपी जेरबंद..

गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३,३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमालासह ट्रक जप्त करून आरोपी जेरबंद..
पुणे:- पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीसांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल
गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास ४३,३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमालासह ट्रक जप्त करून आरोपी  जेरबंद केला असल्याची माहिती मिळाली,दि.११/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक, विश्वास जाधव, आळेफाटा पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक MH 04 HD 7350 यामधून बेकायदा गुटखाची वाहतुक होणार असून सदर ट्रक हा नाशिक बाजुकडून आळेफाटाकडे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने,त्याअनुषंगाने पुणे नाशिक हायवे रोडवर डोंगरे फर्निचर समोर पो.स.ई सचिन पाटील व पो.हवा. पोपट कोकाटे असे नाकाबंदी करीत असताना आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक MH 04 HD 7350 हा ट्रक संशयीत रित्या मिळून आल्याने सदर ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचा
ट्रक चेक केला असता, त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यामध्ये
प्रतिबंधित असलेला विमल कंपनीची सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा एकुण
२८,३६,८००/- ( आठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजार आठशे रूपये ) किंमतीचा मुद्देमाल
मिळून आला.त्यामुळे नमुद ट्रक चालक नामे सादीक अब्दुलवहाब शेख वय ४३ वर्षे रा.
चुनारगल्ली चोपडा ता. चोपडा जि. जळगाव व इतर १ याच्याविरूध्द आळेफाटा पोलीस
स्टेशन गु.र.नं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम१२३,२२३,२७४,२७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम
३०(२)(a),२६(२)(i), २६(२)(iv), २७ (३) (d), २७(३)(e),५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे असून त्याच्याकडून एकुण ४३,३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल
ट्रकसह जप्त करण्यात आला आहे. तसेच नमुद आरोपी नामे सादीक अब्दुलवहाब शेख
यांस गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात येवून फरार आरोपीचा शोध चालू आहे.
  सदरची कामगिरी ही मा श्री संदिपसिंग गिल्ल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण
मा. रमेश चोपडे . अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. रविंद्र चौधर उपविभागीय
पोलीस अधिकारी  जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास
जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पो.हवा. पोपट कोकाटे, विनोद गायकवाड,पंकज
पारखे, अमित माळुंजे, पंडीत थोरात
दहिफळे,गणेश जगताप, ओंकार खुणे, संतोष
कदम, सोमेश्वर भंडलकर यांनी केली आहे.
पो. कॉ. नविन अरगडे, शैलेश वाघमारे, विष्णु
साळुंके, भुंजगराव सुकाळे, पोलीस मित्र मंगेश कदम, सोमेश्वर भडलकर यांनी केली.

No comments:

Post a Comment