आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या वतीने जन सुरक्षा विधेयक विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर - पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 18, 2025

आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या वतीने जन सुरक्षा विधेयक विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर - पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात..

आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या वतीने जन सुरक्षा विधेयक विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर - पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात..
पुणे:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून पक्ष *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे* यांच्या आदेशानुसार दिनांक 17/7/2025 रोजी *पुणे जिल्हा अधिकारी सो* यांना जन सुरक्षा विधेयक विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जन सुरक्षा विधेयक हे सर्वसामान्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे आणि त्यामुळे फंडामेंटल राइट्स आर्टिकल नंबर 19 हा मूलभूत अधिकाराचा कायदा जो की बोलण्याचं स्वातंत्र्य देतो एखाद्या वर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो त्या कायद्याला संपवण्यासाठी जन सुरक्षा विधेयक या सरकारने आणले आहे त्या जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध आहे एकूणच लोकशाही संपवण्याचा घाट या आघोरी सरकारने घातलेला आहे सार्वजनिक व्यवस्था राखण्यास निश्चितच सरकारचे आद्य कर्तव्य आहे मात्र त्या नावाखाली सरकार विरोधी असहमतीचा घटनात्मक अधिकार संघटन बनवणे, प्रचार प्रसार करणे, मोर्चा आंदोलन करणे, या सर्वांवर सरकारी नियंत्रण आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सारखा तरतुदी हुकूमशाही राजवटीची आठवण करून देत आहे जनतेच्या सुरक्षेच्या नावाखालील जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे या  घटनाविरोधी जन सुरक्षा कायद्याला त्वरित रद्द करण्यात यावे व जनतेचे मूलभूत स्वातंत्र्य अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी,, निवेदन देता वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A चे *पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात*, पुणे जिल्हा संघटक पवन धाईंजे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुषमा गरुड, दौंड अध्यक्ष शशांक गायकवाड, हवेली तालुका अध्यक्ष वैभव शिंदे, खेड तालुका अध्यक्ष किशोर सिडाम, शिरूर तालुका अध्यक्ष सुहास कदम, वेल्हे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, मावळ तालुका अध्यक्ष अमित जूगदार, पुणे शहर उपाध्यक्ष डॉर्थीताई थॉमस, पुणे शहर सचिव वनिताताई चव्हाण, पुणे शहर उपाध्यक्ष नवनाथ नेटके, हडपसर विधानसभा अध्यक्ष कृष्णा कदम, खडकवासला विधानसभा अध्यक्ष अजित गायकवाड, पुणे शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अविराज चव्हाण पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत दुधे, दौंड तालुकाध्यक्ष विद्यार्थी आनंद ओव्हाळ, दौंड शहर अध्यक्ष विद्यार्थी अभय भोसले कोथरूड विधानसभा अध्यक्ष डमरे साहेब, खेड तालुका उपाध्यक्ष गणेश कांबळे, पिंपरी चिंचवडचे युवा नेते यश ओव्हाळ, पुणे शहर सदस्य हुमने बंधू व रिपाइं (A) चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

No comments:

Post a Comment