पुणे:- पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई
करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध पणे सुरु असणा-या धंद्यावर कठोर कारवाई करुन समूळ उच्चाटन करण्याचे आदेश मा. पोलीस उप-आयुक्त परि ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे यांनी दिले आहेत.दि.२५/०७/२०२५ रोजी मासरेड चे आयोजन करून पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ हद्दीमध्ये लपून-छपून हातभट्टी तयार करणा-या ठिकाणावर मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणा-या एकुण १६ लोकांवर १६ गुन्हे दाखल करून ४०,७६०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन २०५ लिटरची २०,५४०/-रु.किं.ची गावठी हातभट्टी तयार दारु व १२५००/- रू. किं.चे २५० लि. रसायन जागेवर नष्ट करण्यात आले. अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी २९ पोलीस अधिकारी, ९५ पोलीस अंमलदारांची व ०२
आरसीपी प्लाटुनची विशेष पथके बनवून मोहीम राबविण्यात आली. सदर मासरेड मध्ये पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४ हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डोंगराळ भागात आणि नदी
परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणा-यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणा-यावर करण्यात आली आहे.सदरची कारवई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर श्री.मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे
शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशनकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
No comments:
Post a Comment