आरोपी आबासाहेब गवारे यांस खून प्रकरणात जिल्हा न्यायाधीश बारामती श्री. बी. डी. शेळके यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 24, 2025

आरोपी आबासाहेब गवारे यांस खून प्रकरणात जिल्हा न्यायाधीश बारामती श्री. बी. डी. शेळके यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा...

आरोपी आबासाहेब गवारे यांस खून प्रकरणात जिल्हा न्यायाधीश बारामती श्री. बी. डी. शेळके यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
बारामती:-दिनांक २४/०७/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. २
मा. बी. डी. शेळके. यांनी आबासाहेब रामचंद गवारे रा. गवारफाटा, फलटण रोड,
ता. बारामती, जि. पुणे यांनी बाळासाहेब भानुदास गवारे रा. गवारफाटा, फलटण
रोड, ता. बारामती, जि. पुणे यांचा खून केल्याप्रकरणी सदर आरोपीस भा. द.वी. कलम ३०२ मध्ये दोषी धरून जन्मठेप व पाच हजार रूपये दंड तसेच भा.द.वी. कलम ४५२ मध्ये दोषी धरून ५ वर्षे सश्रम कारावास व २००० /- रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २४/०३/२०२१ रोजी आरोपी आबासो
रामचंद्र गवारे रा. गवारफाटा, फलटण रोड, ता. बारामती, जि. पुणे. यांनी मयत नामे
बाळासाहेब भानुदास गवारे यांच्या घरात घुसून किरकोळ कारणावरून लोखंडी गजाने
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. त्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने
सदर बाबत मयत बाळासाहेब भानुदास गवारे यांचे मुलाने बारामती शहर पोलीस
स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर केस मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक नामदेव
शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी तपास करून सदर आरोपी विरूध्द पुरेसा
पुरावा उपलब्ध झाल्यानंतर बारामती येथील मे. कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदरची केस ही मे. बी. डी. शेळके , यांच्या कोर्टात चालली सरकार पक्षाने सदर
केस मध्ये एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले सदर केस मध्ये सरकारी वकील
म्हणुन श्री. नवले कमलाकर शंकरराव यांनी काम पाहीले. त्यामध्ये साक्षीदारांचा पुरावा
व डॉक्टरांची साक्ष ग्राहय धरून मे. कोर्टाने दि. २४/०७/२०२५ रोजी वरील प्रमाणे
शिक्षा सुनावली.सदर प्रकरणी सरकार पक्षास बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
श्री. विलास नाळे  यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट अमलदार महिला पोलीस
हवालदार श्रीमती उमा एन. कोकरे कोर्ट पैरवी श्रेणी पो.स. ई. जी. के. कसपटे, श्रेणी
पो.स.ई. एन. ए. नलवडे यांनी तसेच अॅड. आशीष सोमनाथ खुंटे, व ॲड. श्रीराम
शैलेश दंडवते यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment