बारामतीत बाल लैंगिक अत्याचार, मारहाण तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 24, 2025

बारामतीत बाल लैंगिक अत्याचार, मारहाण तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल..

बारामतीत बाल लैंगिक अत्याचार, मारहाण तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल.. 
बारामती:-बारामती तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची तक्रार दाखल झाली याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की,अनुसूचित जातीच्या असलेल्या
अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून तिचा विनयभंग केला. त्याच्या घरी सांगूनही पुन्हा तिची छेड काढत तिच्या घरच्यांना मारहाण केली.
याप्रकरणी टोळक्यावर आता बारामती तालुका पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार, मारहाण
तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय बिबे, प्रवीण बिबे,अशोक बिबे आणि नितेश बिबे अशी
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या २४ वर्षीय भावाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार यांची चुलत बहीण ही अल्पवयीन असून बारामतीतील एका गावात आपल्या कुटुंबासोबत राहते.ती बारामतीतील नामांकित कॉलेजमध्ये जाते. एका दिवशी कॉलेजला जात असताना ती रेल्वेची वाट पाहत असताना आरोपी प्रवीण बिबे याने तिची छेड काढून तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीच्या घरच्यांनी याबाबत त्याच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही
त्याची समजूतन काढतो, असे सांगितले. तर मुलीच्या घरच्यांनीही तिच्या मनातील भीती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.याप्रकारानंतरही १० जुलै रोजी दुपारी मुलगी घरी येत असताना आरोपीने तिला रेल्वेत गाठून तिला प्रपोज केले. तसेच त्याने तरुणीला तू माझ्यावर प्रेम केले नाही तर तुझ्या घरातील कोणाला तुझी मदत
करण्याकरिता ठेवत नसतो, तुझ्या का घरातील एक-एकाचे हात पाय मोडून टाकतो, अशी धमकी दिली. 
चौकट...
**यानंतरही कुटुंबीयांना टोळक्याकडून मारहाण,धुडगूस घालणाऱ्या टोळक्यावर पॉस्को,विनयभंग, अॅट्रॉसिटी,मारहाणीचा गुन्हा** 

मुलीने झालेला प्रकार घरी येऊन
सांगितला.दरम्यान, २० जुलै रोजी अकरा
वाजण्याच्या सुमारास दुकानात गेलेल्या तक्रारदाराच्या आतेभावाला आरोपी टोळके लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचा फोन
आला. ते पोहोचल्यावर तक्रारदाराने अशी
मारहाण का करत आहात,विचारणा केल्यावर प्रवीण बिबे आणि विशाल गोरे याने तक्रारदारांच्या घराच्या काचा फोडल्या. त्यामुळे आतेभावाला सोडविण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पोलिस पथक आरोपींच्या मागावर आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे सुदर्शन राठोड,पोलिस उपअधीक्षक बारामती
विभाग, पुणे ग्रामीण यांनी सांगितले,आरोपीने बांबुने मारहाण केली.तसेच तक्रारदाराच्या आतेभावाला गावातील प्रसिध्द मंदिराच्या
पुलाजवळ नेले. या वेळी तक्रारदारांच्या घरचे भांडणे सोडविण्यासाठी आले असता
त्यांनाही आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून विटेने मारहाण केली. तसेच आरोपींनी तुम्हाला
सगळ्यांना संपवून टाकेन, अशी धमकी दिली.यामुळे कुटुंब पूर्ण भयभीत असून लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment