संभाव्या जीवीत हानी रोखणेसाठी
बारामती:-पतंग उडवण्याच्या हंगामामध्ये नायलोंन मांजामुळे अनेक पशु-पक्षी, नागरिकांना गंभीर दुखापती होतात किंवा अनेकजण मृत्युमुखीही पडलेल्या घटना पहावयास मिळतात.त्यामुळे विविध राज्यांमध्ये नायलोंन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आले आहे. नायलोंन मांजा विक्रीवर जानेवारी २०२० च्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी)
निर्देशानुसार बंदी घालण्यात आला आहे. तरीदेखील स्थानिक व्यापारी व विविध ऑनलाइन फॉट फॉर्मवर प्राणघातक धाग्याची विक्री सुरु आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या म्हणले आहे की, सर्व स्थानिक प्रशासन, नगरपरिषदेने आणि पोलिस अधिका-यांनी पतंग उडवण्यााठी "नायलोंन मांजाच्या
वापराविरुद्ध कारवाई करणेचे स्पष्ट निर्देश
देण्यात आले आहेत.त्याअनुषंगाने येत्या काही दिवसामध्ये नागपंचमी हा सण जवळ आल्याने संभाव्या जीवीत हानी रोखणेसाठी नायललोंन मांजा विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करणेबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे, बारामती यांना देण्यात आले. याप्रसंगी अॅड. श्रीधर ताटे, हर्षद कोल्हे,
महेंद्र बगाडे, रमेश गायकवाड, नुरी खान व कल्पना साळुंखे हे उपस्थित होते.
तसेच नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये व आपले परिसरामध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असेल तर पोलीसांना 112 क्रमांकावर कळविणेबाबत वकिलांमार्फत आवाहन करणेत आले आहे .
No comments:
Post a Comment