उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 29, 2025

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन..
पुणे, हडपसर:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रंथप्रदर्शन. प्रशांत अद्वैत फाउंडेशन व बोधक्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्रशांत यांच्या समृद्ध ग्रंथाचे भव्य तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये  भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार २३ जुलै रोजी पॅन इंडिया कंपनीचे सतीश के, बर्कलेझ कंपनीच्या रश्मी अघोर आणि नियती रॉय सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. गंगाधर सातव, डॉ. नाना झगडे, प्रा. ऋषिकेश कुंभार हे उपस्थित होते. या ग्रंथप्रदर्शनामध्ये ‘डीकोडींग सक्सेस’, ‘इन्फायनाइट पोटॅशियल अनलिमिटेड सक्सेस’, ‘संघर्ष अपने विरुद्ध’, ‘विद्यार्थी जीवन’, ‘अद्वैत इन एव्हरीडे लाइफ” आणि ‘इगो’ ‘वेदान्त’ ‘विद्यार्थी जीवन पढाई और मौज’ अशा विविध आचार्य प्रशांत लिखित प्रेरणादायी ग्रंथांची मांडणी करण्यात आली होती. 
     हे ग्रंथ प्रदर्शन २३ ते २५ जुलै २०२५ पार पडले. ग्रंथप्रेमींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक वैचारिक पर्वणी होती. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भेटी दिल्या. तब्बल ३८६ वाचकांनी यामध्ये सहभाग घेत ग्रंथसंपदेची खरेदी केली, यावरून आजच्या तरुणांमध्ये वैचारिक व आध्यात्मिक साहित्याविषयी असलेली उत्सुकता दिसून आली. 
     या उपक्रमात सहायक ग्रंथपाल श्री. पवन कर्डक, अशोक शेकडे, जालिंदर मोरे, अक्षय कोकरे, जीवन शेळके, साधना काळभोर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच, ग्रंथप्रदर्शनाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बोधक्रांतीचे संस्थापक अभिजित देवकाते यांनी आचार्य प्रशांत यांच्या ग्रंथाला भेट देणाऱ्यांना उत्तमपणे माहिती सांगितली.


No comments:

Post a Comment