नागपंचमी निमित्त जैन श्रविका महिला मंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 30, 2025

नागपंचमी निमित्त जैन श्रविका महिला मंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद

नागपंचमी निमित्त जैन श्रविका महिला मंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद
खेळ, उखाणे, मनोरंजन,नृत्य व मंगळागौर चे सादरीकरण 

बारामती: जैन श्राविका महिला मंडळ बारामती यांनी नागपंचमी निमित्त महावीर भवन येथे मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी मंगळागौर व महिलांच्या कला गुणांना वाव देणारा कार्यक्रम होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा व मंडळाच्या 
सल्लागार  मंगला सराफ व राजश्री  कळमकर आणि  जैन श्राविका महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पणा दोशी (खटावकर)  व सचिव प्रियंका दोशी ( खटावकर ) उपाध्यक्ष श्रीमती धनश्री गांधी ,खजिनदार अर्चना वाघोलीकर आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.
 महिलांना व्यासपीठ निर्माण व्हावे, त्यांच्यामधील कलागुणांना व्यक्त करता यावे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन व्हावे म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्षा अर्पणा दोशी यांनी सांगितले.
  होम मिनिस्टर  विजेत्या अनुजा व्होरा आणि द्वितीय मंजिरी दोशी, तृतीय संहिता शहा, चतुर्थ गीतांजली शहा व उत्तेजनार्थ ज्योति शहा ,लक्ष्मी गांधी आणि  उत्कृष्ट उखाणा बदल मंजिरी दोशी  यांना सन्मानित करण्यात आले.
होम मिनिस्टर  चे सादरीकरण अनिल सावळेपाटील यांनी केले गायन सलीम सय्यद व सूत्रसंचालन प्रियंका दोशी ( खटावकर)  यांनी केले.


No comments:

Post a Comment