पंढरीनाथ कांबळे यांना एंटरप्रेनर अवॉर्ड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 30, 2025

पंढरीनाथ कांबळे यांना एंटरप्रेनर अवॉर्ड

पंढरीनाथ कांबळे यांना  एंटरप्रेनर अवॉर्ड 

बारामती:- बारामती एमआयडीसी येथील हर्षल इंडस्ट्रीज अँड पावडर कोटिंग सोल्युशन चे संचालक पंढरीनाथ श्रीरंग कांबळे यांना मंगळवार दि.२९ जुलै रोजी एंटरप्रेनर अवॉर्ड  ने सन्मानित करण्यात आले.

३२ व्या इंटरप्रेनर दिनाच्या निमित्ताने पुणे येथील इंटरप्रेनर  इंटरनॅशनल क्लब च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 

या प्रसंगी मगरपट्टा सिटी चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर
एंटरप्रेनर इंटरनॅशनल क्लब चे सुनील थोरात, राजेंद्र जाधव,सुभाष माहिमकर  व बारामती इंटरप्रेनर क्लब चे चेअरमन प्रमोद काकडे व संजय थोरात, सचिन माने, संजय खटके, बापूसाहेब बाबरे ,अरुण म्हसवडे,राजेंद्र साळुंखे, सुनील गोळे, नरेश तुपे ,अनिल काळे, शरद भोसले, अनिल फडतरे व आदी 
 मान्यवर उद्योजक  उपस्तीत होते.
गेल्या २१ वर्षा पासून बारामती परिसरात नवीन उद्योजक तयार करणे, उद्योजकांना मार्गदर्शन करणे, तज्ञ उद्योजक यांचे व्याख्यान आयोजन करणे औद्योगिक सहली चे आयोजन व  बारामती एंटरप्रेनर क्लब वाढवण्यासाठी प्रत्यन करणे या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कारामुळे आता जबाबदारी वाढली असून नवनवीन शासनाच्या योजना चा लाभ नवीन उद्योजकांना देण्यासाठी उपक्रम राबविणार असल्याचे पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंढरीनाथ कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment