बारामती : बारामतीत वारंवार होत असलेल्या अपघातात आज पुन्हा एकदा तिघांचा बळी घेतला, भरधाव वेगाने वाहने व ओव्हर लोड गाड्यामुळे हे अपघात होत असल्याचे दिसत आहे, दारू पिऊन देखील वाहने चालवून अपघात घडवीला जात असताना मात्र यांच्यावर पाहिजे तशी कारवाई होताना दिसत नाही म्हणूनच की काय पुन्हा पुन्हा असे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले,आज बारामती येथील खंडोबानगर हृदय पिळून टाकणारी दुःखद घटना समोर आली
आहे. रविवारी, २७ जुलै रोजी मोरगाव
रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी
साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात
झाला. एका मुरूम वाहणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हायवाच्या चाकाखाली येत बाप-लेकींचा
दुर्देवी मृत्यू झाला. दुचाकी एम एच १६ सी ए
०२१२ या हायवा ट्रक खाली चिरडली गेली.
अपघातात ओंकार आचार्य (सणसर, तालुका
इंदापूर, सध्या रा. मोरगाव रोड, बारामती)
यांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार यांच्या दुचाकीवर त्यांच्या दोन मुली
होत्या. मधुरा (वय ४) आणि सई (वय १०)
या दोघीही गंभीर जखमी झाल्या. दोघींना
उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं
जाणार होतं. पण दवाखान्यात
पोहोचण्यापूर्वीच दोन चिमुकल्यांचाही मृत्यू
झाला.हायवा ट्रक ला
गाडी धडकून दुचाकी चाकाखाली गेल्याने
तिघेही चेंगरले गेले,यामध्ये तिघांचा बळी गेला असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण
परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं
नाही, याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
हायवा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं
आहे. बारामती शहरातील खंडोबानगर येथे
सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात
झाल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामती
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात पाठवले
आहेत. दरम्यान, अवजड वाहनांच्या अपघातांचे
प्रमाण वाढलं असून यामध्ये अनेक निष्पाप
नागरिकांना आपला जीव गमवावा लागला
आहे. प्रशासनाने,आरटीओ व वाहतूक पोलिसांनी अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता
असल्याची मागणी नागरिकांमधून केली जात
आहे.याआधी देखील याठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांनी लेखी पत्रव्यवहार करून स्पीड ब्रेकर ची मागणी केली होती मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment