बापरे..एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुलगा दोन नातीच्या अपघाती मृत्यूचा बसला धक्का, वडिलांनीही सोडला जीव..
बारामती:-काल बारामतीत खंडोबानगर याठिकाणी हायवा ट्रक ने एकाच कुटुंबातील तिघांचा बळी घेतला हा धक्का सहन न झाल्याने वडिलांनी देखील जीव सोडला एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बारामती इंदापूर हळहळली आज पहाटे त्यांच्या वृध्द वडिलांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळाली,या
घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव
गमवावा लागला होता.आज घरातील चौथा व्यक्तीही गेल्याने त्या कुटुंबावर किती भयानक पर्स8ओढविली असेल याची कल्पना देखील होऊ शकत नाही,काल (रविवारी, ता - 27) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही सोमवारी (ता. 28) निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते.
दोन नातींसह मुलाचा अपघाती मृत्यू
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हायवा ट्रकच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या घटनेत चार वर्षाची मधुरा ओंकार आचार्य व दहा वर्षाच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे तो वास्तव्यास होता. या घटनेने संपूर्ण बारामती
हळहळली. काल ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज ओंकारच्या वडिलांचे निधन झालं आहे. आचार्य यांच्या घरातील 24 तासाच्या आत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,राजेंद्र श्रीनिवास आचार्य असं त्यांचं नाव आहे. ते निवृत्त शिक्षक होते, त्यांचं वय देखील 70 वर्षांपेक्षा अधिक होतं, त्यांना ऑटिझम व शुगर होती, ते बारामतीतील
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, दोन दिवसांपूर्वी
त्यांना घरी आणले होते. त्यांना फळे घेऊन येताना
ओंकार आचार्य यांचा अपघात झाला होता. आज पहाटे त्यांचं देखील निधन झालं आहे.या हृदय द्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर सोशल मीडिया वर या घटनेला जबाबदार असणाऱ्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असून प्रशासकीय व्यवस्थेला देखील दोष दिला जात असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment