सामाजिक भान व जाण जपत केलेले कार्य महान: किरण गुजर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 28, 2025

सामाजिक भान व जाण जपत केलेले कार्य महान: किरण गुजर

सामाजिक भान व जाण जपत केलेले कार्य महान: किरण गुजर 
बारामती:( प्रतिनिधी)प्रत्येकास बालपण तरुण पण वृद्धावस्था आहे या तिन्ही अवस्थेमध्ये सामाजिक भान आणि जाण जपत केलेले सामाजिक काम हे कायमस्वरूपी आदर्शवत व महान असते असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.
रविवार दि.२७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 
प्रभाग क्र १९ येथील गरजू नागरिकांना एस. एस. बॅग हाऊस च्या संचालिका ऍड अंजुमन सय्यद व पदाधिकारी यांच्या वतीने एक हजार नागरिकांना  मोफत संसार उपयोगी वस्तू व स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले या वेळी किरण गुजर बोलत होते.
याप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, बाळासाहेब जाधव, विजय खरात ,राष्ट्रवादी युवक राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अनिता गायकवाड  व कासम कुरेशी, संजय वाघमारे, हरीश सातव,परवेज सय्यद, विशाल जाधव, फातिमा शेख, अभिजित बर्गे, डॉ आलिशा सय्यद व सानिया सय्यद आदी  मान्यवर व प्रभाग १९ मधील प्रमुख पदाधिकारी  उपस्तीत होते.

प्रभागतील रस्ता, लाईट, पाणी आदी समस्या सोडवण्यासाठी  ऍड अंजुमन सय्यद यांनी केलेले प्रयत्न व एस एस बॅग्ज हाऊस च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून सामाजिक ओळख निर्माण केल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
 पर्यावरण, स्वछता ,सामाजिक कार्य व रोजगार निर्मिती करून अजित दादांना अभिप्रेत असलेले कार्य करत आहोतहेच कार्य म्हणजे  दादांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा आहेत असे प्रास्ताविक मध्ये एस एस बॅग्स हाऊस च्या संचालिका ऍड. अंजुमन सय्यद यांनी सांगितले.
संसार उपयोगी वस्तू आणि बॅक मिळाल्याने समाधानी व संतुष्ट असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार डॉ. आलिशा सय्यद यांनी मानले.

No comments:

Post a Comment