बारामती:-बारामतीत अपघाताचे सत्र चालू असल्याचे मागील काही घटनेवरून दिसून येत आहे. नुकताच हायवा डंपर ने तीन जणांचा बळी घेतला ही हृदय पिळून टाकणारी घटना सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, बारामतीच्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये ही घटना मन सुन्न करणारी होती,यावर रहिवाशांनी भरधाव व ओव्हर लोड वाहनांवर कारवाई व्हावी यासाठी आवाज उठविला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन यांनी ओव्हर लोड वाहनांवर व भरधाव वाहणाऱ्या गाड्यावर कारवाई सुरू केली. पण नुकताच बारामती शहरातील सातव चौक याठिकाणी भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेन ने लहान मुलांना उडविले असते परंतु सुदैवाने ते थोडक्यात प्रसंगावधानाने ते वाचले यावेळी जवळ असणाऱ्या नागरिकांनी या क्रेन चालकास चांगलाच चोप दिल्याची चर्चा रंगत आहे. भरधाव वेगाने वाहने चालवून कुणाचा तरी बळी घेणं त्याला जखमी करणं हे धोरण राबविणारी मस्तवाल चालक यांचा माज कुणी तरी उतरायला हवा अशी मागणी होऊ लागली असली तरी तशी प्रकिया कधी राबविण्यात येईल हे येणाऱ्या काळात कळेलच पण तोपर्यंत आपण स्वतः देखील वाहन चालवताना योग्य काळजी घेतली पाहिजे आपल्यामुळे कुणाला इजा होणार नाही हे पाहिलं पाहिजे.
Post Top Ad
Monday, July 28, 2025
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत पुन्हा एकदा अपघात होता होता वाचला;सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही..!
बारामतीत पुन्हा एकदा अपघात होता होता वाचला;सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment