बारामती:- बारामती व बारामती परिसरामधील सर्व पास्टर्स व चर्चेस यांची मिळून अखिल बारामती ख्रिस्ती संघटनेची स्थपना करण्यात आली.
1) जयकुमार महादेवराव काळे( अध्यक्ष)
2) संदेश प्रल्हाद जाधव ( उपाध्यक्ष)
3) राजेश शांतवन जाधव ( सेक्रेटरी )
4) गौरव सुनील जाधव( खजिनदार)
5) सुरेश बाबुराव चव्हाण (कार्याध्यक्ष )
6) जेम्स बाळासाहेब घुगे ( अल्पसंख्यांक व फायनान्स योजना प्रमुख)
***** कमिटी मेंबर्स *****
1) सचिन प्रेमचंद जाधव
2) विवेक मधुकर साळवी
3) दीपक धोंडीराम जाधव
5) प्रशांत रमेश जाधव
6) ब्रदर दिनेश अवघडे
** सन्माननीय पास्टर्स सल्लागार समिती **
1) पास्टर अब्राहम श्रीवास्तव
2) बिशप आशिष पंडेला
3) पास्टर कमलेश बनसोडे
4) पास्टर सुनील जाधव
5) पास्टर सचिन कांबळे
6) पास्टर राजेश गायकवाड
7) पास्टर योसेफ वाकडे
8) पास्टर सचिन वागळे
9) पास्टर ऑलवियर सिंग
10) पास्टर विनय राठोड
11) पास्टर जॉय जाधव
12)पास्टर यशया कोला
13) पास्टर सुनील फुलवरे
अशी संघटनेची सर्व समावेशक पद्धतीने बांधणी करण्यात आली. या संघटने मध्ये सर्व चर्चेस चे प्रतिनिधी व पास्टर्स यांच्या समावेश करण्यात आला आहे त्या मुळे ख्रिस्ती समाजाच्या आत्मिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ख्रिस्ती पास्टर्स व चर्चेसच्या सुरक्षे संदर्भात उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जयकुमार महादेवराव काळे यांनी दिली. पास्टर अब्राहाम श्रीवास्तव यांनी सांगितले कि सर्व चर्चेस व पास्टर्स तसेच बारामती मधील ख्रिस्ती समाज मिळून ख्रिस्ती समाजाच्या उन्नती साठी प्रार्थना पूर्वक प्रयत्न करू. या प्रसंगी बिशप आशिष पंडेला यांनी आश्वासन दिले कि बारामती परिसरातील सर्व चर्चेस व पाष्टर यांच्या सुरक्षे साठी या संघटनेच्या माध्यमातून उपाययोजना केली जाईल. तसेच संघटनेचे सेक्रेटरी राजेश शांतवान जाधव यांनी सदर संघटनेचे सर्व पदाधिकारी व पास्टर्स यांचे एक शिष्ठामंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना व अल्पसंख्यांक मंत्री दत्तामामा भरणे यांना लवकरच भेट देणार आहे.व ख्रिस्ती समाजाच्या समस्या मांडणार आहे. तसेच बारामतीचे प्रसिद्ध उदयोगपती व ख्रिस्ती समाजाचे आधारस्थंभ मानले जाणारे निलेश कुलकर्णी यांनी संघटनेच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी बारामती परिसरातील सर्व चर्चेस चे पास्टर्स व ख्रिस्ती बंधू मोठ्या संख्येने संघटनेला पाठिंबा देण्यासाठी हजर होते.
No comments:
Post a Comment