पोलिसांचे धाबे दणाणले;स्पेशल ड्राईव्हद्वारे उपायुक्तांचा कारवाईचा दणका.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 10, 2025

पोलिसांचे धाबे दणाणले;स्पेशल ड्राईव्हद्वारे उपायुक्तांचा कारवाईचा दणका..

पोलिसांचे धाबे दणाणले;स्पेशल ड्राईव्हद्वारे  उपायुक्तांचा कारवाईचा दणका..
पुणे:कारवाईचा वेगळा पॅटर्न राबविण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवनियुक्त पोलिस उपायुक्तांनी पदभार स्विकारताच धडक मोहिम राबवत कारवाईचा वेगळा पॅटर्न सुरू केला आहे. हद्दीत अचानक 'स्पेशल ड्राईव्ह' राबवत परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी
'स्पा'च्या आडून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावरच दंडूका फिरवला.तर दुसरीकडे 'हार्ट ऑफि सिटी' असणाऱ्या मध्यभागात रात्री व दिवसा अशी मोहिम राबवून बेशिस्त वाहन चालकांसोबतच अवैध दारू विक्रेत्यांवर परिमंडळ एकचे
पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी कारवाई केली आहे. नवख्या अधिकाऱ्यांनी अचानक राबवलेल्या या विशेष मोहिमांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.आयपीएस सोमय मुंडे यांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात उत्कृष्ट काम केले होते. त्यांना राष्ट्रपती शौर्यचक्रपदक देखील मिळाले. लातूर पोलिस अधीक्षक पदावरून त्यांची नुकतीच पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून
बदली झाली. त्यांना परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. परिमंडळ चारचा पदभार स्विकारताच त्यांनी आपली छाप पाडण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या काही दिवसात अवैध धंद्यांची गुप्त माहिती मिळवत त्यांनी
स्पेशल ड्राईव्ह राबवला आहे.एका दिवसात अचानक केलेल्या मोहिमेत त्यांनी तब्बल
अवैध दारू विक्रीप्रकरणात ३५ गुन्हे नोंदवले आहेत. तर दोन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय देखील उघडकीसआणले. यामुळे गुन्हेगारांच्या मनात तर धडकी भरली आहेच पण स्थानिक पोलिसांचे सुद्धा धाबे दणाणले आहे. सिंधुदर्गवरून आलेले आयपीएस कृषीकेश रावले यांना परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनीही अचानक मोहिम राबवत ७ गुन्हे अवैध दारू विक्रीप्रकरणात गुन्हे दाखल केले. सोबतच रात्रीच्या बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवत साडे पाचशे वाहनांचे चेकिंग केले.
त्यातील १४१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तर ११ वाहने जप्त केली आहेत. तर एका ठिकाणी अमली पदार्थांची कारवाई केली आहे. नवनियुक्त उपायुक्तांनी केलेल्या या धडक मोहिमांमुळे सर्वांचे धाबे दणाणले असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment