अपघात की दबलेली हकीकत? पोलिसांनी मागील चाकाचा उल्लेख का केला?सोशल मीडियावर संतप्त भावना होतेय व्हायरल..
बारामती:-बारामतीमध्ये नुकताच घडलेला डंपर अपघातमध्ये ओंकार आचार्य व त्यांच्या दोन कन्यांचा अपघात हा केवळ एक दुर्दैवी घटना नव्हे, तर न्याय व्यवस्थेवरचा मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना ठरत आहे. मृत्यूचा प्रकार अत्यंत भीषण असून प्रत्यक्षदर्शींच्या मते डंपरने ओंकार आचार्य यांच्या गाडीला मागून येणाऱ्या हायवाने(डंपर)समोरून जोरदार धडक दिली, मात्र पोलिसांनी आपल्या प्राथमिक अहवालात "डंपरच्या मागील चाकाची धडक लागल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला" असे नमूद केले आहे. या तथ्याशी विसंगत अहवाल अनेक प्रश्न उपस्थित करतो – अपघातात नेमकं काय लपवलं जातंय? कोणाचा दबाव आहे?
मृत व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळणार का?
प्रत्यक्षदर्शी सांगतात व CCTV फुटेज प्रमाणे– हायवा(डंपर) ने समोरूनच धडक दिली आहे !
अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट सांगितले की, डंपरने थेट समोरून धडक दिली. त्यामुळे जखमांची तीव्रता, शरीराची स्थिती आणि अपघाताचा संपूर्ण तास-तपशील हे दर्शवतात की ही घटना केवळ मागील चाकाची धडक होऊन झालेली नाही.
मग पोलिस अहवालात बदल – कोणासाठी आणि कशासाठी?
जर प्रत्यक्षदर्शी आणि CCTV मते समोरून धडक दर्शवत असतील, तर पोलिसांनी 'मागील चाक' असे का नमूद केले?
यामागे दोनच गोष्टी असू शकतात:
1. प्रकरणाची गंभीरता कमी करण्याचा प्रयत्न?
2. डंपर मालक किंवा कंत्राटदाराच्या प्रभावाखाली चुकीचा रिपोर्ट?
यामुळे पीडित कुटुंबाच्या न्यायाची वाट अधिकच कठीण बनु शकते.
यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
त्यामुळे प्रशासनाने FIR मधील चुकीचा मजकूर तातडीने दुरुस्त करावा,स्वतंत्र समितीमार्फत या अपघाताची चौकशी करावी,पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळावा. डंपर मालकावर व चालकावर कडक कारवाई करावी.
कारण ही घटना केवळ अपघात नाही, तर सिस्टमने दुर्लक्ष केलेला अन्याय आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या पुन्हा कोणी बळी जाईल आणि त्याच्या मृत्यू मधे 'मागील चाक' जबाबदार ठरेल?अशी प्रतिक्रिया व घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यासंबंधी उलट सुलट चर्चा सुरु असल्याचे कळतंय, या संबंधी लवकरच सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, बारामतीकर यासाठी आंदोलन करणार असल्याचे अस्लम तांबोळी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment