बारामती:-बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीत सोमवार दि. १८/८/२०२५ रोजी झालेल्या
भुसार व कडधान्य लिलावामध्ये पिवळ्या मुगाला प्रति क्विंटल १३,७००/- रुपये
इतका उच्चांक्की दर मिळाला. शिवाजी दादासो फाळके यांच्या आडतीवर सिताराम
आटोळे गाव गोजुबावी येथील शेतकरी यांच्या मुगाला हा उच्चांकी दर मिळाला.
त्यासाठी खरेदीदार श्री अमोल वाडीकर यांनी उच्चांकी बोली लावली. मुगाची आवक
कमी असल्याने जादा दर मिळत आहेत. चांगल्या दर्जाच्या ज्वारीला ३७०० रुपये,
चांगल्या प्रतीच्या मकेला प्रतिक्विंटल २४११ रुपये, चांगल्या प्रतीच्या उडीद
शेतमालास प्रतिक्विंटल रु. ७१०० व बाजरीला प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळाला.
खेरदीदार म्हणुन बाजार आवारातील बाळासो फराटे, महावीर वडुजकर, मिलींद
सालपे, शशीकांत सालपे, अमोल वाडीकर, दीपक मचाले, जगदीश गुगळे, संतोष
श्रीमल गुगळे, अशोक भळगट व सतीश गावडे यांनी सहभाग घेतला.
मुगाची आवक बारामती, माण, दहिवडी, इंदापुर व दौंड या तालुक्यातुन होते.
समितीमध्ये आवकेचे प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा दिल्याने शेतक-यांना
लिलावानंतर लगेच पेमेंट मिळत आहे. अशी माहिती समितीचे सभापती श्री विश्वास
आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. शेतक-यांनी आपला शेतमाल
स्वच्छ करुन व वाळवून विक्रीस आणावा, असे आवाहन समितीचे सचिव अरविंद
जगताप यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment