लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप..
बारामती:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम केक कापून करण्यात आला सालाबाद प्रमाणे या वर्षी जिल्हा परिषद शाळा अंजनगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे डायरेक्टर नितीन दादा शेंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी वकृत्व आपल्या कौशल्य शैलीतून मांडले . महापुरुषांची जयंती उत्सव पुढील पिढीला प्रेरणा म्हणून साजरा करणे गरजेचे आहे आपला इतिहास फक्त अभ्यासापुरता न वापरता त्याचा उपयोग वर्तमान व भविष्याकरता योग्य दिशेने विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा असे मत नितीन दादा शेंडे यांनी व्यक्त केले .व आदरणीय दादांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या .
यावेळी अंजनगाव चे माजी सरपंच दिलीप परकाळे. सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे. सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाअध्यक्ष दादाराम झगडे . क-हावागज गावचे उपसरपंच बाळासाहेब खरात. शालेय समिती अध्यक्ष सुरज मोरे. उपाध्यक्ष शरद वायसे. अंजनगाव ग्रामपंचायत उपसरपंच जालिंदर वायसे. माजी उपसरपंच नामदेव परकाळे. बागायतदार अरविंद परकाळे. पोलीस पाटील ईश्वर खोमणे. माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम कुचेकर. माजी ग्रामसुरक्षा दल अध्यक्ष दादासाहेब कुचेकर . अक्षय कुचेकर.संजय कुचेकर. ऋषिकेश कुचेकर. दीपक कुचेकर. प्रतीक कुचेकर. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पिसाळ सर यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुचेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment