उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 2, 2025

उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी

उद्योजकांसाठी  बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी 

वृषारोपन, स्वछता मोहीम व गुणवतांचा सन्मानाने एमआयडीसीचा  वर्धापन दिन संपन्न
बारामती: प्रतिनिधी 
राज्यातील प्रत्येक उद्योग व उद्योजक टिकला पाहिजे त्याला सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत या साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेले कार्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे  त्यामध्ये बारामती अग्रेसर असल्याचे प्रतिपादन बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन (शुक्रवार ०१ ऑगस्ट २०२५)  बारामती कार्यालय येथे संपन्न झाला.
या वेळी वैभव नावडकर मार्गदर्शन करत होते याप्रसंगी  राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक संभाजी होळकर ,महाराष्ट्र चेंबर्स चे चेअरमन शरद सूर्यवंशी, बारामती इंडस्ट्रियल  डेव्हलपमेंट असोसिएशन अध्यक्ष धनंजय जामदार व 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर व उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यालयाचे अधिकारी सचिन यादव,बाळराजे मुळीक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ चंद्रकांत महस्के, तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी किशोर माने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम,महावितरण चे  कार्यकारी अभियंता सोलनकर व प्रकाश देवकाते , तालुका कृषी अधिकारी महेश हाके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मनोज जगताप व विविध खात्यातील अधिकारी आणि एमआयडीसी चे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्तीत होते.

बारामती एमआयडीसी ची स्थापना झाल्या पासून ते आज पर्यंत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे त्यामुळे वर्धापन दिन साजरा करताना कौटुंबिक स्नेह मेळावा च्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले असून या पुढेही  उद्योग व उद्योजक यांना नेहमी सेवा सुविधा देण्यासाठी व  बारामती एमआयडीसी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले

एमआयडीसी स्थापन झालेपासून ते आता पर्यंत राज्यातील प्रगती व बारामती मधील विकास यांचा आढावा घेऊन  घेऊन मा. शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची माहिती मान्यवरांनी मगोगत मध्ये दिली.

एमआयडीसी अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्य यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व २५ वर्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता बारामती  विजयानंद पेटकर, उपअभियंता जेजुरी सिद्धार्थ कदम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळच्या सत्रात एमआयडीसी कॉलनी येथे वृषारोपन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली 
प्रास्ताविक सहायक अभियंता  सौ. व्ही. जी. चौलंग यांनी केले.

राहुल लोंढे यांनी बासरी व पियानो वादन करून  विविध गाणी सादर केली,  वेबसिरीज 'चांडाळ चौकटी'  च्या करामती मधील कलाकारांनी सामाजिक प्रबोधन करून तंटामुक्त ही नाटिका सादर केली 
सूत्रसंचालन सावळेपाटील व आभार क्षेत्र महाव्यवस्थापक गणपत कोळेकर यांनी मानले.

चौकट: 
बारामती एमआयडीसी स्थापन झाल्यापासून  आशा प्रकारचा प्रथमच  कार्यक्रम झाला असून कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना सामावून घेतले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून कौतुक केल्याबद्दल कर्मचारी व कुटूंबीय यांनी समाधान व्यक्त करून असे प्रेरक कार्यक्रम दरवर्षी व्याहवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment