बारामती:- बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा
बारामती येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश, श्रीमती.
एस. आर. पाटील यांनी आरोपी सोनू नामदेव शेटे, वय - ३५, रा.
जगदाळेवस्ती, लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे यांस रोहित रविंद्र कांबळे
याचेवरती खुनी हल्ला केलेप्रकरणी १० वर्षांची सक्तमजुरी व
२०,०००/- रूपये दंड तसेच दंड न भरलेस तीन महिने साधा
कारावास तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३–२५, अन्वये
दोन वर्षे सश्रम कारावास व ५,००० /- रूपये दंड व दंड न भरलेस
एक महिन्याची साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणाची हकीकत :
याप्रकरणी सुमीत रवींद्र कांबळे, रा. लिंगोळी, ता. दौंड, जि. पुणे
यांनी दौंड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की, सन २०१९
मध्ये त्यांची आरोपी सोनु नामदेव शिंदे यांचेबरोबर ओळख झालेली
होती. आरोपी सोनू शेठे याचा फोर व्हिलर गाडया भाडयाने देण्याचा
व्यवसाय होता. रोहित कांबळे यांनी आरोपी सोनू शेठे याचेकडून
स्वीप्ट कार भाडयाने नेली होती. सदर कारमध्ये बिघाड झाल्याने
त्याच्या होणा-या बिलावरून आरोपी व रोहित कांबळे यांची
बाचाबाची झालेली होती.
त्या वादातून दिनांक २२/१०/२०१९ रोजी दुपारी ०३.३०
वाजण्याच्या सुमारास मौजे लिंगोळी, ता. दौंड, जि. पुणे येथील खवटे
हॉस्पीटल दौंड याठिकाणी जखमी रोहित कांबळे व त्याचा भाउ सुमीत
कांबळे असे दुचाकीवरून जात असताना त्यांचा चुलत भाउ सुशांत
कांबळे हा अॅडमीट असल्याने त्यास भेटण्यासाठी लिंगोळी रोडने दौंड
बाजुकडे जात असतांना आरोपी सोनू शेठे याने जखमी रोहित कांबळे
याचेवर डावे मांडीत व पाठीत गोळी मारुन रोहित रविंद्र कांबळे यास
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन तेथुन सोनू शेठे व त्याचा साथीदार पळून गेला
अशी फिर्यादी दिली. त्याअनुषंगाने दौंड पोलीस
स्टेशनमध्ये आरोपी सोनू शेठे व त्याच्या साथीदारावर भा.द.वि.क.
३०७ इतर व शस्त्र अधिनियम ३, २५ इत्यादी कलमान्वये गुन्हा
दाखल झाला. सदर प्रकरणाचा तपास दौंड पोलीस स्टेशनचे
तात्कालीन पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला व
आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला बारामती
येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश, श्रीमती. एस. आर. पाटील
यांचेसमोर चालला. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त व
जिल्हा सरकारी वकील श्री. प्रसन्न जोशी यांनी १५ साक्षीदार तपासले.
सदर प्रकरणात बॅलेस्टिक एक्सपर्ट श्रीमती. योगिता पटाईत, कलिना
न्यायवैद्यक प्रयोगशाळा, मुंबई यांची साक्ष महत्वाची ठरली व त्यांनी
गुन्हयात वापरलेला गावठी कट्टा व रोहित कांबळे यांच्या शरीरातुन
काढलेली गोळी याचे विश्लेषण महत्वाचे ठरले. सदर प्रकरणात
आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे श्री. प्रसन्न जोशी यांनी केलेला
युक्तिवाद मा. न्यायालयाने मान्य करून आरोपी सोनी शेठे यांस १०
वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणामध्ये कोर्ट पैरवी
अधिकारी नामदेव नलवडे तसेच महिला पो. हवा. मनिषा अहिवळे
यांचे मोलाचे मदत झाली.
No comments:
Post a Comment