*नांदेडमधील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमध्ये 'महाआक्रोश आंदोलन'* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 16, 2025

*नांदेडमधील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमध्ये 'महाआक्रोश आंदोलन'*

*नांदेडमधील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमध्ये 'महाआक्रोश आंदोलन'*
बारामती:-नांदेड जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बोरगाव येथे संजीवनी कमळे  लखन भंडारे यांची धिंड काढून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बारामतीमध्ये बहुजन समाज यांच्या वतीने 'महाआक्रोश आंदोलन' करण्यात आले.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि लखन भंडारे यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहनही या आंदोलनात करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध घोषणा देऊन आणि निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे आंदोलन भिगवन चौक बारामती येथे करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आरोपी १)(अ) मारुती लक्ष्मण सुरणे, (ब) माधव लक्ष्मण सुरणे, (का) लक्ष्मण पिराजी सुरणे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.२) या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलिसांनी कोणतेही दबावाखाली न येता या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी.३) या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसेल ४) पीडित कुटुंबियातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करावी तसेच त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी या मागणी करता सदर आंदोलन करण्यात आले. केदार पाटोळे, अनिकेत मोहिते, ॲड. सोमनाथ पाटोळे, साधू बल्लाळ, बिरजू मांढरे, विशाल जाधव, सुनील शिंदे, काळूराम चौधरी, शुभम अहिवळे, राहुल गायकवाड, विजय खरात, मंगलदास निकाळजे,आरती शेंडगे, बापू शेंडगे, पप्पू खरात, किरण बोराडे,सुरज खंडाळे, नंदू खरात, विक्रम लांडगे, संजय भोसले, अनिल भिसे, फैयाज शेख, अजय खरात, यांचे सह्या केलेले निवेदन निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी या आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

No comments:

Post a Comment