पुणे:- पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व
नगरपंचायत निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पारंपरिक बळावर निवडणूक लढविता येत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थितीमुळे अजित पवार यांच्या पक्षाला इतर पक्ष व गटांमधून
उमेदवारांची 'आयात', फोडाफोडी आणि थेट तडजोडी कराव्या लागल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नगरपरिषदा-नगरपंचायतीं मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर तुल्यबळ उमेदवार उभे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि स्थानिक स्वतंत्र गटांमधून कार्यकर्ते-नेते व विरोधक फोडून किंवा त्यांच्याशी सत्तेच्या वाटणीची तडजोड करूनच अजित
पवारांचा पक्ष रिंगणात उतरला आहे.बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत: येथे कट्टर
विरोधक रंजन तावरे यांच्याबरोबर आघाडी करावी लागली.जेजुरी नगरपरिषद: सर्वपक्षीय वर्चस्व असलेले दिलीप बारभाई यांचा मुलगा आणि माजी नगरसेवकांना अजित गटात घेऊन उभे केले आहे. या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील(NCP) निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली
आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने अंतर्गत असंतोष वाढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः 'त्यांच्या खास स्टाइल'ने नाराजांना समजावण्याचा प्रयत्न करत
आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांचे राजकीय वर्चस्व आता पूर्वीसारखे एकहाती राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे
No comments:
Post a Comment