बारामतीत न्यायालयाच्या आदेशामुळे 'या' दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित..
बारामती:-बारामतीनगर परिषद निवडणूकीची रंगत वाढत असताना बारामती नगरपरिषद निवडणूक सातत्याने चर्चेत आली.नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाच्या) 8 उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला
होता.विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी रक्कम घेऊन अर्ज मागे घेतल्यामुळे तशी चर्चा आहे हा विजय मिळाला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20 कोटी रुपये देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप देखील केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता बारामती
नगरपरिषदेच्या निवडणुकीत आणखी एक मोठा कायदेशीर तिढा निर्माण झाला आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक
13 (ब) आणि प्रभाग क्रमांक 17 (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाईल. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका नियोजित वेळेनुसारच
होणार आहेत.निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यावर 26 नोव्हेंबर रोजी भाजपचे नेते
सतीश फाळके आणि ऍड अविनाश गायकवाड यांनी नव्याने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाले होते, मात्र या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने यावर सुनावणी घेतली. उमेदवारांनी नामनिर्देशन सादर करतानाचे
सीसीटीव्ही फुटेज आणि आवश्यक पुरावे सादर केले.न्यायालयाने ‘नैसर्गिक न्याय' तत्त्वानुसार दोन्ही अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.त्यानुसार फाळके आणि गायकवाड यांनी काल नव्याने उमेदवारी दाखल केली.निवडणूक अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी स्पष्ट केले की, या नव्या अर्जांची छाननी, माघारी प्रक्रिया आणि
अंतिम मान्यता या सर्व बाबींवर राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित आदेश आवश्यक आहेत. त्यामुळे या दोन जागांची निवडणूक आयोगाचा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित राहील असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment