बदलापूर:- राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडू करण्यात आला आहे. बदलापुरमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे,काही महिलांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. सर्वच राजकीय
पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अनेक ठिकाणी महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत.
बदलापुरमधील महायुतीमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगेहात पकडण्यात आले.बदलापुरच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले.बदलापुरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील शांतीनगर भागात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता पैशाने भरलेली पाकीट मतदारांना वाटत असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली
होती. या माहितीच्या आधारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पैशांची पाकिटं वाटमाऱ्या या महिलांना रंगेहात पकडत त्यांना जाब विचारला. शिवसेनेच्या
पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली. या पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment