बारामती नगरपरिषदेची नगराध्यक्षसह या सात ठिकाणची निवडणुक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलली..
बारामती:- बरं निवडणुकीची रंगत वाढत असताना धक्कादायक निकाल पुढे आला,बारामती मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला.याचिका फेटाळली, मात्र नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत, त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहेत. साहजिकच एकूण सात जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याने बारामतीचे नगर परिषदेचे मतदान
थेट 20 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती,त्या ठिकाणी नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच नव्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे.
या नव्या प्रक्रियेनुसार 4 डिसेंबर रोजी नव्याने
निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 11 डिसेंबर 2025 रोजी जारी केली जाणार असून 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार
आहे. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल होणार आहे ज्या प्रभागातील उमेदवारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या ठिकाणी नव्याने संपूर्ण प्रक्रिया होणार असून उमेदवारांना नव्याने अर्ज दाखल करता येणार आहेत यात नगराध्यक्ष पदाचा देखील समावेश असल्याने नगराध्यक्ष पदासाठी अजूनही अर्ज
दाखल होऊ शकतात.
No comments:
Post a Comment