बापरे..बारामतीत नक्की चाललंय काय; स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

बापरे..बारामतीत नक्की चाललंय काय; स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली बलात्कार..

बापरे..बारामतीत नक्की चाललंय काय; स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली बलात्कार..
 बारामती :- बारामतीत गेल्या काही महिन्यापासून महिला अत्याचार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, अत्याचार करणारे कोण होते हे कुठल्या लॉजवर असे प्रकार करून ,तर काही ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून धनदांडगे यांनी कसा अत्याचार केला याची चर्चा ताजी असताना परत स्टिंग ऑपरेशनचे काम
असल्याचे सांगत दोन सोशल मीडियाच्या
प्रतिनिधींनी महिलेला लॉजमध्ये नेऊन
बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
बारामती एमआयडीसी परिसरात घडली.
याप्रकरणी शेख अझहर कादरी ( रा.कोंढवा, पुणे) आणि ओंकार राजेंद्र शेलार
( रा. भिगवण, ता. इंदापूर ) या दोघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड करीत
आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर दि.3 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास पीडित फिर्यादी यांना स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने काम असल्याचे सांगून आरोपींनी बारामतीत आणले. त्यानंतर एमआयडीसी येथील व्हीआयपी लॉजमध्ये
नेऊन रात्री 11 वाजताच्या सुमारास पीडिता फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले, घटनेची मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.फिर्यादी रडू लागल्यावर आरोपींनी फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ करून जातीवाचक असे अपशब्द  बोलले. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवे ठार करण्याची धमकी दिली आणि मुलांनाही मारून टाकण्याची धमकी दिली.त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपींनी फिर्यादी यांना घरी सोडले. त्यांनतर फिर्यादीस पुन्हा शिवीगाळ व दमदाटी
केल्याने फिर्यादी यांनी दोघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.बारामतीत काही लॉजवर अश्या घटना घडत असताना पोलिसांनी अश्या लॉजवर पाळत ठेवणे गरजेचे आहे, यापूर्वी लॉजवर एका महिलेची हत्या करण्यात आली होती, आत्ता तरी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचं असल्याचे बारामतीकर बोलत आहे.

No comments:

Post a Comment