बानपचे थकीत भाडे असणाऱ्या गाळेधारकांना जाहीर आवाहन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 20, 2026

बानपचे थकीत भाडे असणाऱ्या गाळेधारकांना जाहीर आवाहन...

बानपचे थकीत भाडे असणाऱ्या गाळेधारकांना जाहीर आवाहन...    बारामती:- बारामती नगर परिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी, जागा(गाळा)भाडे विभागांची वसुली मोहीम चालू केलेली असून जागा भाडे विभागामार्फत माहे जानेवारी 2026 पासून थकबाकीदारांना पंधरा दिवसांच्या मुदतीची नोटीस वाटून थकीत रकमेचा भरणा करणे बाबत अवगत केले होते .त्यानुसार पुन्हा अंतिम 24 तासाची नोटीस बजावून तसेच वेळोवेळी भेटी देऊन दुकानभाडे भरणे कामे अवगत केले होते .तथापि त्यानंतरही गाळेधारकांकडून भरणा केला नसलेल्या गाळ्यांना सील करण्याची कारवाई आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. तरी त्यास अनुसरून आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी बारामती नगरपरिषद मालकीचे धोंडीबा आबाजी सातव उद्योग भवन तसेच यशवंतराव चव्हाण उद्योग भवन येथील 1,74,940 /- रु थकबाकी असणारे गाळे आज रोजी सील करण्यात आले आहेत.
           तरी उर्वरित थकीत भाडे असणाऱ्या गाळेधारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्यात थकीत व चालू रकमेचा भराणा तात्काळ करून  प्रशासनास सहकार्य करावे व गाळा सील करून जप्त करण्याची व गाळ्याचा फेर लिलाव करण्याची कटू कारवाई टाळावी ही विनंती करण्यात आली असल्याचे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment