बहुचर्चित अपहरण प्रकरणातील तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 19, 2026

बहुचर्चित अपहरण प्रकरणातील तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात..

बहुचर्चित अपहरण प्रकरणातील तरुणी
 बारामती शहर पोलीस ठाण्यात..
बारामती:- नुकताच पुणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बहु चर्चित रंगलेला अपहरण प्रकरण चांगलेच गाजले याची चर्चा व बातम्या सगळीकडे प्रसारित झाल्या उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या, आंदोलने झाली, मात्र या अपहरण प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे.अपहरण झाल्याची तक्रार दाखल असलेली तरुणी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने स्वतःच्या इच्छेने घरातून निघून गेल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा अपहरण झाले नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत.दरम्यान, युवतीच्या अपहरणाच्या घटनेचे इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये संतप्त पडसाद उमटून बुधवारी भिगवण बंद ठेवण्यात आले होते, संतप्त नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. भिगवणमध्ये बुधवारी दिवसभर तणावपूर्व शांतता होती.पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी भिगवणमध्ये मोठ्या पोलीस फौजफाट्यासह
तळ ठोकला.आरोपींना लवकरच अटक केली जाईल.नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण परिसरात कुटुंबीयांबरोबर खरेदीसाठी निघालेल्या २१ वर्षांच्या तरुणीच्या डोळ्यांत
मिरचीची पूड टाकून मंगळवारी तिचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे दोघे सख्खे भाऊ असून, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात राहायला आहेत.ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी, तसेच
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दिवसभर तणावाची परिस्थिती होती.त्यानंतर अपहरण प्रकरणातील तरुणीने व्हिडिओ व्हायरल करून सांगितले की मी स्वेच्छेने गेले आहे.

No comments:

Post a Comment