धावत्या टेम्पोखाली स्वतःला दिलं झोकून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 19, 2026

धावत्या टेम्पोखाली स्वतःला दिलं झोकून..

धावत्या टेम्पोखाली स्वतःला दिलं झोकून.. मोरगाव:- अपघाताचे प्रमाण वाढत असले तरीमात्र याठिकाणी स्वतःच गाडी खाली आला याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी चौकात
मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे गजबजलेल्या असलेल्या मोरगाव चौकात वाहतूक सुरळीत सुरू असतानाच एका अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची
धक्कादायक घटना घडली.
या घटनेत संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, सदर इसम काही काळापासून चौक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरताना
दिसत होता. तो कधी रस्त्याच्या कडेला उभा राहत, तर कधी वाहनांच्या हालचालींकडे एकटक पाहत होता.त्याच्या वागण्यातून तो अस्वस्थ असल्याचे जाणवत होते.दरम्यान, चौकातून जाणारा आयशर टेम्पो हळूहळू पुढे जात असताना अचानक त्या इसमाने क्षणाचाही विलंब न करता टेम्पोच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकून दिले.ही घटना इतकी अचानक घडली की उपस्थित नागरिकांना काही कळण्याच्या आतच सर्व काही घडून गेले.टेम्पो चालकाने तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.जोरदार धडकेमुळे इसम गंभीर जखमी झाला आणि काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चौकात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात
पाठवला. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो कोण आहे, कुठून आला आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, नागरिकांनी ओळख पटविण्यास मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments:

Post a Comment