राष्ट्रसेवा आणि समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनसेवेसाठी तत्पर रहावे -शेखर वढणे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 11, 2026

राष्ट्रसेवा आणि समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनसेवेसाठी तत्पर रहावे -शेखर वढणे

राष्ट्रसेवा आणि समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनसेवेसाठी तत्पर रहावे -शेखर वढणे          को-हाळे प्रतिनिधी:- भाजपा परीवार व सकल हिंदु समाज बांधव यांच्या वतीने को-हाळे बु. येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठीकीचे मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वडणे म्हणाले की राष्ट्रसेवा आणी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भाजपा परीवारातील प्रत्येक सदस्याने जनसेवेसाठी तत्पर रहावे तसेच आगामी अभियानामध्ये सर्वानी सहभागी व्हावे  असे अहवान करण्यात आले . तसेच बैठकीला भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष सुनिल माने सरचिटणीस झुंजार गोलांडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद  खोमणे हिंदुत्ववादी संघटनेचे गणेश आटोळे , महिला अध्यक्ष पोर्णिमा निंबाळकर जिल्हा चिटणीस मनोज कोकणे अमित खोमणे  को-हाळे बु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख स्वप्निल माळशिकारे बाळासाहेब गुळुमकर  को-हाळे बु येथील सकल हिंदु समाज बांधव उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्ते अमित खोमणे यांनी को-हाळे बु  येथील निरा डाव्या कालव्यावरून जाणारा लोखंडी पुल हा नित्कृष्ठ दर्जाचा आहे तसेच यामुळे नाईकमळा येथील नागरीकांची गैरसोय होत आहे तरी नवीन मोठा पुल बांधून मिळावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष  वडणे यांच्याकडे केली तरी वडणे यांनी बैठकीचा समोरोप होताच पुलाची पहाणी केली. पुल प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे अश्वासन देण्यात आले. 
या बैठकीचे सुत्रसंचलन स्वप्निल माळशिकारे यांनी तर आभार बापुराव फणसे यांनी मांडले.

No comments:

Post a Comment