कामगार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप; फिल्ड फार्मा ११ संघाने मारली बाजी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 2, 2026

कामगार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप; फिल्ड फार्मा ११ संघाने मारली बाजी..!

कामगार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप; फिल्ड फार्मा ११ संघाने मारली बाजी..!
बारामती:- स्वर्गीय कॉम्रेड ओंकार आचार्य व स्वर्गीय कॉम्रेड विशाल सरोदे यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून फार्माकोअलान्स व सर्व मेडिकल रिप्रेंझेंटेटिव्ह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कामगार चषक* या भव्य क्रिकेट स्पर्धेचा नुकताच अत्यंत उत्साहात आणि दिमाखात समारोप झाला. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत फिल्ड फार्मा ११ संघाने विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून त्यांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील खिलाडूवृत्तीला वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये एकोपा  वाढीस लागावा, या मुख्य उद्देशाने बुरहाणी क्रिकेट ग्राउंड बारामती येथे या विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत एकूण ७ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील अंतिम आणि चुरशीचा सामना फिल्ड फार्मा ११ आणि बारामती ज्वेलर्स ११ यांच्यात रंगला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात फिल्ड फार्मा ११ संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला.

स्पर्धेतील प्रमुख पारितोषिके:

प्रथम क्रमांक(विजेता) : फिल्ड फार्मा ११

द्वितीय क्रमांक (उपविजेता): बारामती ज्वेलर्स ११ 

तृतीय क्रमांक:- डायनामिक्स ११
चतुर्थ क्रमांक:- बारामती ॲग्रो स्टार

मालिकावीर (Man of the Series): सागर गावडे

उत्कृष्ट फलंदाज: भिमा मुलगे

उत्कृष्ट गोलंदाज:  शितल पाटील 

उत्कृष्ट किपर: राहूल जगताप 
उत्कृष्ट फिल्डर: सचिन बालगुडे
उत्कृष्ट जेष्ठ खेळाडू: समीर हरगुडे
उत्कृष्ट युवा खेळाडू: दिनेश निकाळजे


या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ . राजीव खरे,  जिवक सरोदे, विशाल भाऊ हिंगणे नगरसेवक,युवराज यादव अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन, निखिल ओसवाल, सनी माने, अनील तुपे,  , यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कष्टाचे कौतुक केले.

"सहकरी मित्रांना श्रद्धांजली अर्पण व कामगारांच्या अथक परिश्रमाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्व खेळाडूंनी दाखवलेला उत्साह आणि शिस्त कौतुकास्पद होती," असे मनोगत फार्माकोअलायन्स व सर्व मेडिकल रिप्रेंटेटिव्ह बंधुंनी  यावेळी व्यक्त केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच मेडिकल रिप्रेंटेटिव्हनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागी खेळाडू, प्रेक्षक आणि मान्यवरांचे आभार मानून या क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment