नवरात्री निमित्त लेक सुरक्षित, देश सुरक्षित पथनाट्यातुन जनजागृती;अखिल भारतीय मराठा महासंघ च्या महिलांचा सामाजिक उपक्रम.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2026

नवरात्री निमित्त लेक सुरक्षित, देश सुरक्षित पथनाट्यातुन जनजागृती;अखिल भारतीय मराठा महासंघ च्या महिलांचा सामाजिक उपक्रम..

नवरात्री निमित्त लेक सुरक्षित, देश सुरक्षित पथनाट्यातुन जनजागृती;अखिल भारतीय मराठा महासंघ च्या महिलांचा सामाजिक उपक्रम..
बारामती: प्रतिनिधी:- बारामती भगिनी मंडळ नवरात्री निमित्त  आयोजित शारदोउत्सव कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघ महिला  शाखा च्या वतीने लेक सुरक्षित, देश सुरक्षित (नवदुर्गा ते निर्भया) पथनाट्य सादर करण्यात आले.
या प्रसंगी  शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा  शर्मिला पवार  व शुभांगी  पवार, डॉ सुहासिनी सातव , भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सुनिता शहा, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ऍड  प्रियंका काटे, शहर  अध्यक्ष अर्चना सातव,तालूका अध्यक्ष ऍड सुप्रिया बर्गे,
जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्षा स्वाती ढवाण, व विविध संस्थांच्या पदाधिकारी उपस्तीत होत्या.
पथनाट्याच्या माध्यमातून महिला आणि मुलींमध्ये जनजागृती करण्यात आली, देशात मुली बाललैगिक शोषणाला बळी पडत आहेत, महिलांना आणि मुलींना पथनाट्यातून गुड टच ,बॅट टच, स्वतःचे संरक्षण कसे करावे कायदेविषयक मार्गदर्शन, करण्यात आले
आई तुळजा भवानी वेशभूषा, वकील, भाविक ,मुली, सामान्य नागरिक ,पालक यांचा सुंदर अभिनय या प्रसंगी महिलांनी सादर केला.
   ऍड.विणा फरतडे, प्रियंका जराड, धनश्री देसाई, ज्योती जाधव, अर्चना सातव, स्नेहल सातव, शोभा मांडके,वैशाली सावंत, नम्रता ढमाले, शितल गायकवाड,पुनम रणदिवे,शितल यादव,
आदी महिलांनी विविध भूमिका साकारत मुलगी वाचवा ,मुलगी शिकवा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका पाणी वाचवा,पर्यावरण वाचवा या विषयी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.सूत्रसंचालन ऍड सुप्रिया बर्गे व आभार ज्योती जाधव यांनी मानले.

चौकट: 
शालेय मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना पालक,शिक्षक यांची जवाबदारी वाढली असून  शालेय मुलींना गुड टच, बॅड टच विषयी जनजागृती आवश्यक आहे त्यासाठी मोफत व्याख्यान देणार आहे तरी इच्छुक शाळा, महाविद्यालय,संस्था यांनी संपर्क करावा. 
सौ अर्चना सातव 
व्याख्यता, लेखिका 
बारामती

फोटो ओळ: नवरात्री निमित्त लेक  सुरक्षित, देश सुरक्षित पथनाट्य प्रसंगी कलाकार, मान्यवर व ,पदाधिकारी

No comments:

Post a Comment