पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक :मतदानासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरणार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 17, 2020

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक :मतदानासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरणार

*पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक :*
*मतदानासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरणार*  

पुणे,दि.17:- विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू न शकणा-या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड तसेच पारपत्र आदी नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या कागदपत्रांबरोबरच केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर/शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे अथवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधित अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांनी नोंद घ्यावी, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मृणालिनी सावंत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

No comments:

Post a Comment