गोळीबार करून गुन्हा करणारे लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलीसांकडून जेरबंद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 30, 2020

गोळीबार करून गुन्हा करणारे लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलीसांकडून जेरबंद

गोळीबार करून गुन्हा करणारे लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलीसांकडून जेरबंद
बारामती:-पोलीसांचे वेषात येवून पिस्टलचा धाक दाखवून,दि. o६/०८/२०२० रोजी राजगड पो.स्टे.हददीतील कापुरहोळ येथे फिर्यादी श्री.संजय किसन निकम यांचे बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये ५ आरोपी आले तेव्हा त्यांचेपैकी १ आरोपी हा पोलीस उपनिरीक्षकाचे गणवेशात, १ आरोपी पोलीस नाईक गणवेशात, २ खाजगी गणवेशात व १ आरोपी असल्याचे भासविले तसेच बनावट पोलीस गणवेशात आलेल्या आरोपीनी तुम्ही चोरांकडून ७ ग्रॅम सोने घेतले आहे ते सोने परत देता का, आमचे सोबत पुण्याला येता असे म्हणून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुकानातील ३४.५ तोळे सोन्याचे दागिने, १ मोबाईल फोन असा एकूण रू. १७,३२,०००/-किंमतीचा
मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता तसेच नागरीकांना आरोपींचा संशय आल्यानंतर लोक त्यांना पकडण्यास गेले असता आरोपीनी नागरीकांचे दिशेने गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत राजगड पो.स्टे. येथे गु.रजि.नं. ५०९/२०२०,भा.दं.वि.कलम ३९५,३९७,३०७,१७०,१७१,
आर्मस अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.दि. ०८/०७/२०२० रोजी जेजुरी पो.स्टे. हददीतील निरा गावातील भैरवनाथ एजन्सी चितळे शॉपी येथील दुकानातून पाण्याचे बाटली मागण्याचा बहाणा करून चार अनोळखी इसमानी फिर्यादीचे डोकयास रिव्हॉल्व्हर लावून दम देऊन फि्यादीची सोन्याची चैन व सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा रू ९५,०००/- किंमतीचा माल जबरीने चोरून स्विफ्ट कारमधुन पळून गेलेबाबत जेजुरी पो.स्टे. येथे गु. रजि. नं.२५६/२०२०, भा.दं.वि.कलम ३९२,३४, आर्मसु अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच वडगाव निंबाळकर पो.स्टे. हृद्दीत दि २६/१०/२०२० रोजी संध्या, १७.३० दा.चे सुमारास पळशी येथील सराफी व्यवसायिक श्री. अमर रंगनाथ कलथे यांच्या अमर ज्वेलर्स दुकान बंद करून विक्रीसाठीचे दागिने मोटार सायकलवरून घेवून घरी जाताना ३ अज्ञात आरोपीनी बजाज पल्सर मोटार सायकलवरून येऊन फिर्यादीस गाड़ी बाजूस घेण्यास सांगितले व फिर्यादीचे तोडावर मिरची पावडर टाकून फिर्यादीचे मोटार सायलकला लाथ मारून खाली पाडून फिर्यादीचे ताब्यातील ११ तोळे सोने व १० किलो चांदी अशी रू.११,६५,०००/- किंमतीचे दागिन्यांची बॅग जबरीने पळवून नेली होती त्याबाबत वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि.नं. ४९८/२०२०,भा.दं.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच जेजुरी पो.स्टे. गु.रजि. नं ३२३/२०२०, भा.दं.वि.कलम ४५७,३८० या गुन्हयामध्ये आरोपीनी दि. २३/०९/२०२० रोजी निरा गावचे हृददीतील अमेझॉन कंपनीचे स्टोअर फोडून त्यातील डी.व्ही.आर. ३ मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकुण रू. ७७,४९६/- किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता.सदरचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते सो., उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरणांवकर, बारामती विभाग, श्री. धनंजय पाटील, भोर विभाग यांनी पोलीस निरीक्षक श्री. पदमाकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा,पूणे ग्रामीण यांना गुन्हयातील मुख्य आरोपी यांना तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्याप्रमाणे पो.नि.श्री. पद्माकर घनवट यांनी स्था.गु.शाखा, पुणे ग्रा. येथील पो.
स.ई.श्री.शिवाजी ननवरे, श्री. अमोल गोरे, वडगाव निंबाळकर पो. स्टे.कडील स. पो.नि.श्री. सोमनाथ लांडे, पो.स.ई.शेलार, पो.स.ई.कवितके, सहा.फौज. दत्तात्रय गिरीमकर, शब्बीर पटाण, पो.हवा.चंद्रकांत झंडे, उमाकांत कुंजीर, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजीत भुजबळ,अभिजीत एकशिंगे, पो.कॉ. अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, खान,मारकड, भुजबळ, खोमणे, सानप, जाधव, जैनक, चेतन पाटील, सुनिल कोळी, पो.कॉ.दगडु विरकर, अक्षय जावळे, समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून त्या पथकाचे मार्फतीने संमातर तपास सुरू केला.सदर गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींचा वावर असणारे परिसरात साधारणपणे १५० कि.मी.परिसरातील २०० सी.सी. टी.व्ही. कॅमेरे तपासून आरोपीचे वावरासंदर्भात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून तपास केला होता परंतु आरोपी हे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलीसांनी पकडू नये म्हणून काळजी घेत होते परंतु नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकास तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, जेजुरी पो.स्टे. गु.रजि.नं. ३२३/२०२०, भा.दं.वि.कलम ४५७,३८० या गुन्हयातील चोरीस गेलाला माल हा चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे व शाम शशीराज मुळे हे वापरत आहेत त्यावरून स्था.गु.शा.पथकाने दोन्ही आरोपीना एक
सिताफ,संशयीत मोटर सायकल व तीन मोबाईल फोनसह दि. २५/११/२०२० रोजी वाघळवाडी येथून ताब्यात घेतले होते । त्यांचेकडे केले तपासात चंद्रकांत लक्ष्मण लोखडे, पठवळ, ता, फलटण, जि. सातारा याने त्याचे साथीदार शाम शशीराज मुळे, रा. सध्या रा. व्ही.एन. ए.सिटी सोसायटी, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे, निलेश
बाळासो निकाळजे, रा.सोनगाव बंगला, ता, फलटण, जि. सातारा, अक्षय विलास खोमणे, रा. कोर्हयळे बुद्ुक,ता, बारामती, जि. पुणे, राहुल पांडुरंग तांबे, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि. पुणे, प्रविण प्रल्हाद राउत, रा. चिखली,ता. इंदापूर, जि. पुणे, पप्पू उर्फ सुहास सोनवलकर, रा. वडले, ता, फलटण, जि. सातारा, प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने, रा. तामशेतवाडी, ता.माळशीरस, जि. सोलापूर यांचेसह मिळून वेगवेगळया ठिकाणी जबरी चोरी,घरफोडी, दरोडा असे गुन्हे केल्याचे पोलीस पथकास निष्पन्न झाले होते त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना पथकाने अक्षय विलास खोमणे, निलेश बाळासाो निकाळजे व राहुल पांडुरंग तांबे यास दि. २८/११/२०२० रोजी अटक केलेली आहे.दि २९/११/२०२० रोजी पाहिजे आरोपी नामे पप्पु उर्फ सुहास सोनवलकर, प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने व प्रविण प्रल्हाद राउत हे वडले, ता. फलटण, जि. सातारा या टिकाणी असलेबाबत माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी स.पो.नि.श्री. सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. व पो.स.ई.श्री. शिवाजी ननवरे, स्थागु.शा. यांनी टीमसह जावून प्रविण प्रल्हाद राउत यास ताब्यात घेतले व पप्पू उर्फ सुहास सोनवलकर, प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने याचा पाठलाग करीत असताना त्यांनी पोलीसांचे दिशेने पोलीसांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून ऊसावे शेतात पळून गेले त्याबाबत पो.को.भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण गामीण पो.स्टे. येथे भा.दं.वि.कलम ३०७,३५३,३४, आ्म अॅक्ट कলम ३,२५ प्रमाणे गुण्हा दाखल झालेला आहे. सध्या दोन्ही आरोपी हे पाहिजे आरोपी असून त्यांचा विविध पथकामार्फत शोध सुरु आहे.
आरोपी चंद्रकांत लोखंडे व त्याचे टोळीकडून उघडकीस आलेल्या गुन्हयांची माहीती खालीलप्रमाणे.१) बारामती तालुका पो.स्टे.गु.रजि.नं. ०९/२०२०, भा.दं.वि.कलम ३९२ ,२) बारामती तालुका पो.स्टे.गु, रजि.नं. ३५५/२०२०,भा.दे.वि.कलम ३९२ ,३) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ६०७/२०२०,भा.दं.वि.कलम ३९२, २४,४) बारामती शहर पो.स्टे.गु.रजि.नं ३९६/२०२०, भा.दं. वि.कलम ३९२
५) बारामती शहर पो.स्टे.गु.रजि.नं. ३८४/२०२०, भा.दं. वि.कलम ३९२
६) जेजुरी पो.स्टे.गु.रजि.जं. २५६/२०२०, भा.दं. चि. कलम ३९२,३४, आर्मस् अॅक्ट कलम ३,२५
७) जेजुरी पो.स्टे.गु.रजि.नं. ३२३/२०२०, भा.दं. वि.कलम ४५७,३८०,
८) राजगड पो.स्टे.गु.रजि.नं. ३४०/२०१९, भा.दं. वि.कलम ३९२,३४
९) राजगड पो.स्टे.गु,रजि.नं. २६६/२०१९, भा. दं. वि.कलम ३९२
१०) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु,रजि.नं. ४९८/२०२०, भा.दं.वि.कलम ३९२,३४
११) राजगड पो.स्टे. येथे गु.रजि.नं.५०९/२०२०, भा.दं. वि.कलम ३९५,३९७, ३०७, १७०, १७१ आर्मस्अक्ट कलम ३,२५,
१२) लोणंद पो.स्टे.गु.रजि.नं. ३८५/२०२०, भा.दं. वि. कलम ३९२,३४,
१३) लोणंद पो.स्टे.गु.रजि.नं. ४१८/२०२०, भा.दं. वि. कलम ३९२,५०६,३४,
१४) वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु.रजि.नं.६०/२०२०, भा.दं. वि.कलम ४५७,३८०, ५११,त्याचप्रमाणे नमुद टोळीने गुरसाळे,जिल्हा- सोलापुर, कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणी देखील आरोपींनी जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे तसेच आरोपीनी इतर ठिकाणीही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे त्याबाबत अधिक तपास चालु आहे.सदर गुन्हयातील आरोपीनी संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून त्याआधारे गुन्हे केले असल्याचे निसपन्न झाले असल्याने आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का)कायदयांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.राजगड पो.स्टे. येथील गुन्हयाचा तपास पो.नि. श्री. विनायक वेताळ व वडगाव निंबाळकर पो. स्टे. येथील गुन्हयाचा तपास स.पो.नि.श्री. सोमनाथ लांडे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment