व्याजापोटी घेतलेल्या जमिनी सावकार पुढाऱ्या कडून परत घेण्यासाठी दाखवला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदेनी हिसका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

व्याजापोटी घेतलेल्या जमिनी सावकार पुढाऱ्या कडून परत घेण्यासाठी दाखवला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदेनी हिसका

बारामती : शहरातील एका प्रतिष्ठित पुढाऱ्याला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चांगलेच  वठणीवर आणले. एका गरीब शेतकऱ्याकडून सावकारीसाठी लिहून घेतलेली जवळपास तीन
कोटी रूपयांची जमीन पोलीस अधिकारी यांच्या हिसक्याने शेतकऱ्याला मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेला आता चांगले यश येतअसून, सावकारांचे धाबे दणाणले आहे.बारामतीतील जळोची परिसरातील एका प्रतिष्ठीत पुढाऱ्याचा हा किस्सा असल्याचे समजते असे2अनेक किस्से असल्याचे ही दबक्या आवाजात समजत असून, पोलीस अधिकारी नामदेव शिंदे यांनी याबाबत सज्जड दम दिला असून सावकारीतून बळकावलेली जमीन परत देण्याचा आदेश दिला असल्याचे कळतंय. 2017 मध्ये नागवडेवस्तीवरील एका शेतकऱ्याला त्याने
दहा लाख रूपये दहा टक्के व्याजाने दिले. संबंधित शेतकऱ्याने महिना लाख रूपये याप्रमाणे अठरा महिने पैसे देऊनही हा पुढारी
अजून त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी करत होता. इतके करून तो थांबला नाही तर बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून दे म्हणून तो मागे लागला होता. सततच्या धमक्यांनी संबंधित शेतकरी घाबरला होता. पैसे दिले नाही तर तुझ्या जमिनीवर राजकीय वजन वापरून आरक्षण टाकायला लावीन अशीही धमकी त्याने दिली होती. नामदेव शिंदे यांनी सावकारांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेच्या
बातम्या वाचून संबंधित शेतकर्याने त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. शिंदे यांनी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर सावकाराला पोलीसांचा सांगावा गेला... पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपण किती मोठे राजकीय नेते आहोत, आपल्या किती ओळखी आहेत याचा पाढा वाचून झाल्यावरही नामदेव शिंदे त्याला भीक घालत
नाही उलट कारवाईची तयारी सुरू झाल्याने अखेर नरमलेल्या या पुढाऱ्याने संबंधित जमीन त्या शेतकरयाला उलटून देण्याची तयारी दाखवली व जमीन उलटून पुन्हा त्याच्या नावे करून दिली.आजच्या बाजारभावाप्रमाणे या दीड एकराची किंमत तीन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या शेतकर्याने पोलीसांचे आभार मानले आहेत. दरम्यान कोणीही सावकार त्रास , धमक्या देत असल्यास त्यांनी तातडीने पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले असून त्यास त्रस्त नागरिक प्रतिसाद देत असून तक्रारी दाखल करण्याचे धाडस करीत असून याबाबत अजून सविस्तर बातमीमधून प्रसिद्ध केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment